
तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या चंदन भाई शिंगरे यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक सेवेचा वसा हाती घेऊन जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून सामाजिक ऋण फेडण्याचे कामगेली दोन वर्षापासून सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याचे मुंबई तसेच महाराष्ट्रात प्रचंड कौतुक केले जात आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेने या ट्रस्ट चे संस्थापक – अध्यक्ष चंदन शिंगरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आतापर्यंत त्यांनी ट्रस्ट च्या माध्यमातून ५ ते १५ वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी त्यात प्रामुख्याने डोळे तपासणी, एनिमिया तपासणी, तसेच तरुण आणि वयोवृद्ध साठी अस्थमा, संधिवात, अपेंडिक्स, हार्निया, थायरॉईड, रक्तदाब अशा रोगांची मोफत तपासणी करून त्यांवर मोफत औषधोपचार करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचप्रमाणेदर शनिवारी मोफत नेत्र तपासणी कांस्यथाली मसाज, चुंबकीय चिकित्सा थेरपी, पंचकर्म उपचार असे सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा अत्यंत माफक दरामध्ये उपचार सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. तसेच माफक दारात व्हीलचेअर, ऑक्सिजन मशीन, मोफत वाचनालये इत्यादी सामाजिक उपक्रम ट्रस्ट मार्फत राबवले जात आहेत.ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी मोफत आधार नोंदणी आणि मोफत लसीकरण आणि रुग्णवाहिका सेवा असे उपक्रम हाती घेतले आहेत
तेव्हा या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी
शिवगड कार्यालय, शॉप नंबर २/३/१०, बी-विंग, सी- गुल को.औ.हौ.सोसायटी, चंदन ड्रेस वाला समोर, दादी शेठ रोड, मालाड (प्), मुंबई ४०००६४. मोबाईल नंबर.८५९१२४२९२८ या पत्त्यावर संपर्क साधुन
जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.