
वसई/ वार्ताहर : कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून व मालकांकडून तुटपुंज्या पगारावर बोळवण केली जाते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणून पिळवणूक केली जात असून,यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही.असा इशारा भाजपचे सरचिटणीस जॉन पीटर यांनी दिला आहे.
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे प्रमुख सल्लागार आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर,कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत , सरचिटणीस सुहास माटे, उपाध्यक्ष अमोल जाधव यांच्या सूचनेनुसार शनिवारी महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय मांडवकर आणि वसई विरार महानगरपालिका सरचिटणीस तथा भाजप वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष जॉन पिटर यांच्या अध्यक्षतेखाली नालासोपारात पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून संघटनेची वसई विरार मधील पुढील वाटचाल ठरविण्यात आली.सदर प्रसंगी कोषाध्यक्ष रोहन नेरुरकर,परिवहन विभाग कार्याध्यक्ष दिलीप गायकवाड,औद्योगिक विभाग सरचिटणीस निलेश राणे,उपाध्यक्ष प्रशांत वर्तक, अमित शोत्री, गणेश पाटील,वैद्यकीय विभाग कार्याध्यक्ष अमित राणे,चिटणीस प्रगती चोरगे, सहदेव देसाई,अनिल नारकर,
अंकुश वरेकर,किरण धनावडे, महापालिका कामगार संघटक सोनल राठोड,अश्विनी जोशी,प्रज्ञा कदम,अविनाश कदम, सुनंदा पोटभरे, नीला चौधरी,मंदा पांढरे शिबिराला उपस्थित होते. यावेळी कामगारांचे ठेकेदाराकडून आणि मालकाकडून पिळवणूक केली जात असल्याची माहिती देण्यात आली त्यावर अशी मिरवणूक यापुढे सहन केली जाणार नाही.जर आमच्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे. प्रशासनाने लक्षात घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा जॉन पीटर यांनी दिला.