
वसई: दीपावलीच्या शुभ दिनी दुर्लक्षित अशा किन्नर भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे “देवेंद्र भेट” किट देऊन भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी आगळीवेगळी दीपावली साजरी केली. वसई-विरार परिसरातील 30 किन्नरांना यावेळी तांदूळ, साखर, साबण, स्टीलचा ग्लास व डब्बा तसेच टूथपेस्ट आदी वस्तूंचा ‘देवेंद्र भेट’ किटचे वाटप उत्तम कुमार यांनी केली.
उत्तम कुमार यांनी बोलताना, माझा प्रत्येकवेळी कोणताही समाज दुर्लक्षित राहिला नाही पाहिजे असा मानस असतो. आज किन्नर समाजाच्या भगिनींच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून दिवाळी साजरी झाल्याचे समाधान वाटले.
यावेळी युवा मोर्चा वसई रोड मंडळ अध्यक्ष कल्पेश चौहान, मनोज कार्या, सुनील कुमार, अरुण कुमार आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.