
पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित पतंजली योग समिती मुंबई पालघर विभाग द्वारा सहयोग शिक्षक बनू इच्छिणार्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .देश परदेशातूनही सहङ्गयोगशिक्षक प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला आहे .यापूर्वीदेखील ऑनलाईन पद्धतीने सहयोग प्रशिक्षण घेण्यात आले त्यावेळी देखील मोठ्या संख्येने देश-विदेशातून साधकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला व सहयोग प्रशिक्षण परीक्षा यशस्वीपणे पार केली 14 नोव्हेंबर 2021रोजी ऑनलाईन सह- योगशिक्षक प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. त्यासाठी ज्या नागरिकांना व साधकांना या ऑनलाइन सह- योगशिक्षक प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे व स्वतःचं तथा समाजाचा आरोग्य सुदृढ ठेवायचा आहे व सर्व व्याधींपासून मुक्त व्हायचे आहे त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे पालघर जिल्हा प्रभारी शांताकुमार जी यांनी आवाहन केलं आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक नागरिकांनी व साधकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी म्हटले आहे.14 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2021 पर्यंत हे ऑनलाइन सह-योगशिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू राहणार आहे या शिबिराची वेळ सकाळी 6 ते 8.30 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे ऑनलाइन पद्धतीने अष्टांग योग,आसन क्युप्रेशर ऑटोमनी होम रेमेडीज, होम हवन यज्ञ,मुद्रा ज्ञान आयुर्वेदिक औषधाबद्दल ची माहिती अशा विविध प्रकारे या शिबिरामध्ये योग शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जवळजवळ 28 दिवस हे प्रशिक्षण सुरु राहणार असून अत्यंत तज्ञ हुशार कर्मठ योगशिक्षक यांच्याद्वारे योग प्रशिक्षण देण्यात येणारे त्याचबरोबर एमडी डॉक्टर यांच्याकडून देखील आयुर्वेदिक औषध, नाडी शोध, संपूर्ण शरीरातील रचनेबाबत देखील या योग प्रशिक्षण मध्ये सचित्र माहिती देण्यात येणार आहे. आपल्या आजूबाजूला असणारी झाड जडीबुटी यांचा औषधासाठी कसा उपयोग होऊ शकता याचा सखोल ज्ञान या शिबिरांमध्ये देण्यात येणार आहे.ङ्ग पतंजली योगपीठ द्वारे संपूर्ण भारतात व भारताबाहेर नागरिकांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग प्रशिक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःच स्वतःचा डॉक्टर व्हावा या उद्देशाने योग प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये असलेल्या व्याधी योगाद्वारे पूर्णपणे नष्ट केल्या जात आहेत. आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी या ऑनलाईन सहयोग प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना होणार आहे.आजकालच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला स्वतःकडे बघण्यासाठी वेळ मिळत नाही.त्यामुळे अनेक आजार आपण घेऊन फिरत असतो आणि त्यानंतर आपली अर्धी कमाई डॉक्टरांकडे औषध साठी व्यर्थ खर्च होत असते. हे जर थांबवायचे असेल व स्वतःला निरोगी सुदृढ आयुष्य जगायचे असेल तर या ऑनलाइन योग शिक्षक प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. स्वतः बरोबरच आपण समाजातील इतर लोकांना देखील योग शिक्षण देऊन त्यांना ही त्यांचं आयुष्य निरोगी राखण्यासाठी सहकार्य करू शकता असे पालघर जिल्हा प्रभारी शांता कुमार यांनी म्हटले आहे तरी लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधावा असे आवाहन पालघर जिल्हा प्रभारी शांताकुमार यांनी केले आहे