
मुंबई-गिरगाव-प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांसकडून
सेजल एंटरटेनमेंट आयोजित ४ था रंगकर्मी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल बुधवार, दिनांक १० नोव्हेंबर, २०२१ रोजी मुंबई साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील एकूण २०० फिल्म्सनी सहभाग घेतला होता. त्यातील ३० फिल्मचे ऑफिशिअली सिलेक्शन होऊन १३ फिल्म्सचे स्क्रिनिंग पार पडले. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यंदा स्टोरी टेलिंग (पॅरिस) या शॉर्ट फिल्मला प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं तर हॅप्पी जर्नी (भारत) आणि डेर नेस्टलिंग (जर्मनी) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले. बेस्ट लॉकडाऊन फिल्म पारितोषिक Am I Audible..? (भारत) या फिल्मला मिळालं, तर बेस्ट डॉक्युमेंटरी बांबू बल्लाड्स (भारत) या फिल्मला दिलं गेलं आणि बेस्ट ऍनिमेशन फिल्म द पीस ऑफ केक (तायवान) ला दिलं गेलं. या वर्षी देखील विदेशातील फिल्म्सचं वर्चस्व दिसून आलं. या सर्व फिल्म्सचं परीक्षण कुमार गौतम आणि प्रमोद शेलार यांनी केलं होतं. तर या सोहळ्याची सुरूवात माजी नगरसेवक मा. श्री. दिलीप नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते सुनील जाधव यांनी आपली उपस्थिती दर्शवली, तर नृत्याची बाजू सदभावना मुंबई सुवर्णा भागवत आणि वैषमपायन गमरे यांच्या ग्रुपने सांभाळली. निवेदन गीता डांगे यांनी केलं. तसेच गेली बरीच वर्षे कार्यरत असलेले रंगमंच कामगार शंकर गाजुला यांचा पडद्यामागचे रंगकर्मी म्हणून सत्कार करण्यात आला. या सोहळ्याची सांगता आयोजक प्रकाश शांताराम पवार यांच्या भाषणाने झाली. आयोजन टीममधील प्रियांका कासले, सुबोध पवार, महेंद्र भंडारे, संदीप कांबळे, वृषाल गुडेकर, श्रेयस पवार, ऋतुजा केळकर, सेजल पवार, प्रफुल पवार, अंकिता ढोकले, चेतन पडोळे,साहिल जाधव, मानव पालकर या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.