
प्रतिनिधी: ……….दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता मैत्री संस्था व खीदमतुल मुसलेमीन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट पापडी तर्फे ” कायदेविषयक शिबीर व जनजागृती ” चे कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाले. सदरचे कार्यक्रम हे मा. आसिफ नासीर शेख, एल एल बी स्टुडंट, व महाराष्ट्र युआ अध्यक्ष : मैत्री संस्था, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तालुका विधी सेवा समोती वसई व वसई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे विधी साक्षरता शिबिराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात सहभागी होऊन मुख्य अतिथी मा. न्यायाधीश वाय. ए. जाधव साहेब व मा. न्यायाधीश एस एस जायस्वाल साहेब , वसई न्यायालय, आणि मा.नोवेल डाबरे, वकील मा. हरीश गौड, वकील, मा. सुजाता रावते, वकील, मा.सबा शेख, वकील, मा. भक्ती मोरे, वकील, मा.स्टेंली फर्नांडिस, वकील यांनी कायदेविषयावर ” महिलांचे घरगुती हिंसाचारापासून सवरक्षण, आरोपींचे अधिकार, जेष्ठ नागरिकांचे कायदे व नालसा व मालसा विषयक कायदे”, या बाबत मार्गदर्शन केले.सूत्र संचालन मा.फिरोज खान यांनी केले व आभार प्रदर्शन मा. सुरज भोईर , अध्यक्ष मैत्री संस्था यांनी केले. कार्यक्रमात काही गरजू लोकांनी आपल्या बरोबर होणाऱ्या अन्याया बाबत व पोलीस सहकार्य न करत असल्या बाबत प्रश्न ही विचारले.कार्यक्रमात खूप प्रमाणात लोकांची उपस्थिती लाभली होती.
सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. फिरोज खान, मा.शमीम फिरोज खान, मा. आसिफ नासीर शेख, मा. निसार खान, मा. अमजद शेख, मा. आसिफ खान, मा. मुजीब चिपळूणकर यांनी फार परिश्रम केले.