राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हा निरीक्षक माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांची आढावा बैठक आज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी कॉलेज कॉलेज दिवाणमान वसई( प)येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
तसेच पक्षाच्या निर्देशाप्रमाणे सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ मा.निरीक्षक साहेब ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आला मान. जिल्हाध्यक्ष राजारामजी मुळीक साहेब ह्यांना प्राथमिक सदस्य करून ह्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला
ह्यावेळी बोलताना पक्ष संघटन वाढवण्यासाठी सूचना व मागर्दशन निरीक्षक साहेब ह्यांनी केले तसेच जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून ही मोहीम यशस्वी करण्यास सगळ्यांनी एकत्रित काम करा असे मार्गदर्शन केले. मा जिल्हाध्यक्ष ह्यांनी केलेल्या कामाचा संक्षिप्त आढावा सादर केला.
तसेच फ्रंटल ,सेल च्या अध्यक्षांनी केलेल्या कामाचा आढावा मा निरीक्षक साहेब ह्यांना लिखित व छायांकित स्वरूपात दिला ह्यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *