विरार : स्व. बाळासाहेब ठाकरे याच्या नावाने शासनाने १४ ऑक्टोबर २०२० मध्ये रस्ते अपघात विमा योजना अमलांत आणली पण अजूनही ही योजना कागदावरच रेंगाळत असल्याने, आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच औचित्य साधत बाळासाहेब ठाकरे यांची समाधी असलेल्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जावून या योजनेचे फलक झळकवत ठाकरे सरकारला या योजनेची आठवण करून दिली आहे.

गेली एक वर्ष सातत्याने पाठपुरावा करून देखील शासन यात लक्ष देत नाही म्हणून रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी ही अनोखी शक्कल लढवत ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले. रस्ते अपघातात अनेक जणांचा अवेळी बळी जातो अथवा कायमस्वरूपी व्यंगत्व येते, उपचारासाठी खर्च उपलब्ध करता अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा वेळी ही योजना दिलासा देणारी आहे परंतु योजने अंतर्गत एकही रुग्णालय अंगीकृत नसल्या कारणाने सरकार - प्रशासन जनतेची दिशाभूल करत आहे. निदान हिंदूह्रदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच भान राखत तरी हे सरकार ही योजना सुरू करतील अशी अपेक्षा व्यक्त करत हीच साहेबांना श्रद्धांजली अर्पण होईल असे मत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *