
प्रतिनिधी :
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या निधीत मोठा अपहार होत असल्याचे वृत्त आहे. सदर बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.
या बाबत अधिक माहिती अशी की, शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडीतील मुलांना जो पोषक आहार दिला जातो त्यात मोठा अपहार अपहार होत असून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम केले जात आहे. वसई पंचायत समिती अंतर्गत टेंभी कोल्हापूर हद्दीत अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पोषक आहार योग्य प्रकारे मिळत नाही. त्यात अपहार होत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा लाभ देताना कोणतेही क्षेत्र वंचित ठेवता येत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासी क्षेत्रातील देवरूपकर नगर तसेच भाटी बंदर भागातील रहिवाशांना एकात्मिक बाल विकास योजनेतील सेवा लाभ मिळालेले नाहीत. या भागातील रहिवाशांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. जननी समृद्धी योजनेचे लाभ गरोदर महिलांना दिले गेलेले नाहीत. जननी समृद्धी योजनेनुसार गरोदर महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपये व किट दिली जाते. या सर्वच सेवांपासून रहिवाशांना वंचित ठेवण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणी अंगणवाडी सेविका प्रमोदीनी घरत यांच्याकडून माहिती प्राप्त करण्याकरिता व प्रतिक्रिया घेण्याकरिता प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी.

