
आदिवासी महिलेला मनपा कर्मचारी अधिकारी कडुन धक्का बुक्की मारहाण

मनमानी कारभार करणाऱ्या सह. आयुक्त रुपालि संख्ये विरुद्ध तात्काळ कारवाई करुन पदावरुन निलंबित करा अन्यथा मनपाला घेराव घालु – लाल बावटा
प्रतिनिधी :- निर्मळ कातकरी पाड्यालगत निर्मळ विद्यालयासमोर तेथील स्थानिक कायम स्वरुपी रहिवासी अरुणा मुकणे ह्या आदिवासी कातकरी समाजाच्या असुन त्या भूमिहीन मजुर आहेत. गेल्या कितेक वर्षी पुर्वी पासुन त्या वडापाव ची टपरी लावून त्यातना जे काही दोन पैसे मिळतील त्यातना आपल्या परीवाराची उपजीविका करत होत्या. आज २३ नोव्हेंबर रोजी दुपारी महानगरपालिका ने त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देतां त्यांच्या टपरीवर बेकायदेशीर पणे तोडक कारेवाई करण्यात आली. निर्मळ हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे करण्यात आलेली आहेत. नगरपालीका त्या लोकांना पाठीशी घालून आदिवासी कातकरी गरीब नागरिकांच्या पोटावर पाय मारण्याचे काम करत आहे. अरुणा मुकणे ह्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याची भरपायी मनपाने करुन देण्यात यावी नाहीतर नगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा भा. मा. ले. पक्ष लाल बावटा चे कार्यकर्ते काॅ. शेरु वाघ यांनी दिला.