
गेल्या १० वर्षांपासून सातत्याने २६ नोव्हेंबर रोजी दृष्टी फाऊंडेशन व पनवेल शहर जिल्हा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री.किशोर देवधेकर सर यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिनानिमित्त संविधान गौरव रँली चे आयोजित करण्यात येते. यंदाही दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिनानिमित्त संविधान गौरव रँली* चे आयोजन करण्यात आले. पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते श्री.प्रितमजी म्हात्रे,स्थायी समिती सदस्य श्री. गणेशजी कडू, खांदेश्वर पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक श्री.देविदास सोनावणे ,
पनवेल ग्रामीण पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र दौंडकर महानगरपालिका अग्निशमन अधिकारी श्री. अनिल जाधव, कामोठे पोलीस निरीक्षक शैलैश भद्रे,खारघर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संदिपान माळी,आदी अधिकारींना संविधान उदे्शिका भेट देऊन संविधान उदे्शिकेचे वाचन करण्यात आले. तसेच २६/११ भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. सदर प्रसंगी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. सतिश जी पाटील, राष्ट्रवादी नेते सुरते,प्रभाकर कांबळे जिल्हाध्यक्ष शेकाप मागासवर्गीय विभाग, खारघर प्रभाग ५ अध्यक्ष महेश कुमार राऊत राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष श्री. गणेश पाटील, जिल्हा सचिव श्री.सुहास बनसोडे, जिल्हा सचिव श्री. गोविंद मोरे, जिल्हा संघटक बशिस्ट राय,कामोठे शहराध्यक्ष यशवंत लोखंडे, कामोठे प्रभाग १२ अध्यक्ष विकी मोहबे, कामोठे प्रभाग १३ अध्यक्ष राहुल थोरात, प्रभाग १४ उपाध्यक्ष रुपेश गेजगे व महिला पदाधिकारी उपस्थित होते.



