परिवहन आयुक्त कार्यालयाचे आदेश

प्रतिनिधी

विरार- वसई क्षेत्रातील ऑटोरिक्षा दर निश्चित करून अंमलबजावणी करा, असे आदेश सहाय्यक परिवहन आयुक्त स. अ. गिरी यांनी उपप्रदेशिक परिवहन अधिकारी वसई यांना दिले आहेत.

विरार येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नवनिर्माण रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक मालक संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष महेश कदम यांनी या संदर्भात ८ ऑक्टोबर २०२१ रोजी पत्र दिले होते. या पत्रात महेश कदम यांनी; वसई क्षेत्रातील ऑटोरिक्षा दर निश्चित करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.

मात्र हा विषय उपप्रदेशिक परिवहन अधिकारी वसई यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याने सहाय्यक परिवहन आयुक्त स. अ. गिरी यांनी याबाबत उचित चौकशी व कार्यवाही करून अर्जदार यांना याबाबत कळवण्याचे आदेश दिले होते; मात्र उपप्रदेशिक परिवहन अधिकारी वसई यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात २५ हजारहून अधिक रिक्षा आहेत. मात्र या रिक्षाना निश्चित असा दर पत्रक नाही. परिणामी रिक्षाचालक आणि प्रवाशी यांच्यात भाड़े घेण्यावरून तू तू मै होते .वास्तविक कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने रिक्षात दोन प्रवाशी भरून दुप्पट भाडे घ्यावे असे आदेश पारित केले होते,परंतु आताची वस्तुस्थिती लक्षात घेता इतर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवाशी भरून वाहतूक करण्याला निर्बध नाहीत,मात्र रिक्षा चालकास निर्बंध त्यांनी भाडे कित्ती अकरावे याचे दर आज ही निश्चित केलेले नाहीत, त्यामुळे रिक्षा चालक प्रवाशांची लूट करत आहेत अशा संभ्रम निर्माण झालेला आहे, हा संभ्रम व सतत प्रवाशी रिक्षा चालक यांच्यात होणाऱ्या वादाला ब्रेक लागावा म्हणून रिक्षा संघटनेच्या माध्यमातुन रिक्षाचे भाडे दर पत्रक निश्चित वप्रवाशी संख्या याबाबत परिवहन विभागाने जनतेच्या रहदारी ठिकाणी अथवा रेल्वे स्टेशन लगत भाडे दर पत्रक प्रदर्शित करावेत असे महेश कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

भाडे आकारणी पडसाद मागील काही दिवस वसई-विरार शहरात उमटत आहेत. याबाबत परिवहन व वाहतूक पोलीसही बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत,त्यामुले लवकरच शेयरिंग रिक्षा दर पत्रक परिवहन विभागाने पारित करावे म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहोत

मागील दोन दिवस तर या भाड़ेवाढीला वैतागलेल्या प्रवाशांनी वसई-विरारमधील रिक्षा प्रवासावर अघोषित बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती.अशा लोकांना एक सांगणे आहे की, चौथा सीट वर बसून प्रवास करणे हे चुकीचे आहे व याला सर्वस्वी जबाबदार आहेत ते चौथ्या सीट वर बसून प्रवास करणारे प्रवाशी . परिवहन विभागाने १(चालक)अधिक ३(प्रवाशी) अशी परवानगी दिलेली आहे, त्यामुळे आपण ही चौथा सीट वर बसून धोकादायक प्रवास करण्याचे टाळा असे आम्ही आव्हान करत आहेत. राहता राहिला प्रश्न भाडे वाढ चा तर इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत हातावर पोट असलेला रिक्षाचालक इंधनाच्या किंमती वाढल्या तरीही दर निश्चित होत नाहीत म्हणून कोविड- 19च्या काळात शासनाने पारित केलेलेच दर घेत आहे याला सर्वस्वी जबाबदार तर, दर पत्रकाळा विलंब करणारे उपप्रादेशिक अधिकारी आहेत त्यांच्या वर कोणीही बहिष्कार टाकताना दिसत नाही. वसई विरार मध्ये पाणी प्रश्न, वीज प्रश्न ,रस्त्याच्या समस्या असे अनेक समस्याच्या जाळ्यात अडकलेले वसई विरार शहर परंतु या संदर्भात आवाज उठवताना कोणी दिसतं नाही तेव्हा मूग गिळून गप्प बसतात. परंतु रिक्षा चालकां बद्दल काही विषय असेल की बिळात लपलेली सर्व बांडगुळे डोकी वर काढतात . दालन वळणाचे महत्त्वाचे साधन म्हणून रिक्षा या वाहनाकडे पाहिले जाते व कोविड मध्ये ते सिद्ध सुद्धा झाले.ज्या रिक्षाचालकाचा आज सामान्य जनता निषेध करते तोच रिक्षाचालक कोविड मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवेचे कार्ड काढून प्रसूती साठी महिलेला वेळेवर दवाखान्यात पोहचवत होता. तसेच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे काम करत होता. हे सामान्य जनता लगेच विसरली! व करू लागली रिक्षाचालकांचा निषेध हा रिक्षा चालक गल्लीबोळात सुद्धा जाऊन प्रवाशांना त्याच्या जाण्याच्या ठिकाणी सुखरूप पोहचवतो .म्हणून रिक्षातून प्रवास करणार्यांनीच चौथी सीट नाकारावी असे आव्हान महेश कदम यांची सामान्य नागरिकांना केले आहे .असे करूनही रिक्षाचालक चौथी सीट भरल्या शिवाय रिक्षा हलवत नसतील तर रिक्षा चालकाचा रिक्षा क्रमांक आपल्या भ्रमणध्वनी नोंद करून स्थानिक परिवहन विभागाच्या कार्यालयात तक्रार करावी

वरील पार्श्वभूमीवर सहाय्यक परिवहन आयुक्त स. अ. गिरी यांनी उपप्रदेशिक परिवहन अधिकारी वसई यांना दिलेल्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी झाल्यास सामान्य प्रवाशांना आणि रिक्षा चालकांस दिलासा मिळेल, अशी अपेक्षा महेश कदम यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *