कारवाईत पालिकेचे हात मात्र आखडते

वसई भाजप शहर मंडळ सरचिटणीस अमित पवार जनहीत याचिका करणार

प्रतिनिधी

वसई- वसईतील सागरशेत पेट्रोल पंपावरील व्यावसायिक गाळ्यांची दुरुस्तीच्या नावे पुनरबांधणी करण्यात आली असून; हे बांधकाम अनधिकृत व पालिकेची दिशाभूल करणारे असल्याने या बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र पालिका प्रभाग ‘आय’कडून कोणतीही कारवाई होत नसल्याने वसई भाजप शहर मंडळ सरचिटणीस अमित पवार जनहीत याचिका करण्याचा निर्णय घेतला आहे.

सागरशेत पेट्रोल पंप मालक रिचर्ड फोस यांनी नऊ गाळ्यांच्या दुरुस्तीकरता परवानगी मागितली होती. मात्र फोस यांनी हे नऊही गाळे भुईसपाट करून ते नव्याने बांधले आहेत. असे असताना वसई-विरार महापालिकेच्या आय प्रभागाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर यांनी २९ जुलै २०२१ रोजी केलेल्या पाहणी अहवालात या ठिकाणी ८ गाळ्यांचे बांधकाम झाले असल्याची नोंद केली आहे.

त्यामुळे पालिका अधिकारीच सागरशेत पेट्रोल पंपावरील अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मालमत्ता क्रमांक-व्हीव्ही१९/१०३० स.ता. वसई, जिल्हा पालघर या दुकानाच्या गाळ्यांना धोका निर्माण झाल्याने वसई-विरार महापालिकेने १८ डिसेंबर २०२० च्या पत्रानुसार भारत रिफायनरी लि. पेट्रोल पंप यांना स्ट्रुक्टरल ऑडिट करून दुरुस्ती सूचवली होती.

मात्र भारत रिफायनरी लि. पेट्रोल पंप यांनी दुरुस्तीऐवजी हे गाळे जमीनदोस्त करून या ठिकाणी नवे बांधकाम केले आहे. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याने ते निष्कासित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीनुपालिकेने संबंधितांना एमआरटीपीची नोटीस बजावली आहे. त्यांनी त्यांच्या परवानगीची कागदपत्रे नगररचना विभागाला सादर केली आहेत. त्यावर प्रोसेस सुरु आहे. मी अतिक्रमण अधिकारी असलो तरी कारवाईचा निर्णय प्रभारी सहाय्यक आयुक्तच घेणार आहेत.

सार पालिकेच्या आय प्रभागाने भारत रिफायनरी लि. पेट्रोल पंप यांना ५ एप्रिल २०२१ रोजी बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्या त नोटिस बजावली होती. तर २३ जुलै २०२१ रोजी प्रत्यक्ष पाहणी अहवाल तयार करून यात ८ गाळ्यांकरता तीन हजार चौरस फुटांचे बांधकाम केल्याचे म्हटले आहे.

मात्र पालिकेने त्यापुढे कोणतीच कारवाई केलेली तक्रारदार अमित पवार यांनी पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर, आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *