
आरोग्य हीच खरी संपत्ती
करोना काळात इतर आजारावर विशेषता मुले व महिला याच्या आजारावर खूप दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागात व झोपडपट्टीत ही संख्या जास्त आहे. गरीबातील गरिबाला चांगले आरोग्य व उपचार मिळावे या हेतूने मुंबई येथील दसरा प्रकल्प अंतर्गत वनोठा पाडा,नालासोपारा (पू.) येथे वस्तीतील श्रमिक वर्गासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना काळात वस्तीमध्ये जनजागृती करताना डायबिटीस, ब्लड प्रेशर, हाडांचे आजार, डोळ्यांचे आजार ई. आजार असलेले रुग्ण तसेच वेगवेगळ्या समस्या असलेली लहान मुले भीतीपोटी औषधोपचारासाठी हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकले नाहीत.अशा लोकांना समोर ठेवून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर आरोग्य शिबिरामध्ये महिला, पुरूष, छोटी मुले अशा एकूण १८६ जणांनी सहभाग घेतला. घरापर्यंत तेही मोफत तपासणी व उपचार उपलब्ध झाल्याने नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
स्विच इंडिया संस्था आणि स्री रोग तज्ञ डॉ. तेजस्विता यांनी या शिबिरासाठी महत्त्वाचे योगदान दिले.हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल इंगळे तसेच प्रकाश भवरे, जयसिंग रणदिवे,रतिव पाटील,रोहन चव्हाण, सुनिल मिश्रा,जेसिका,गीता जोएल डाबरे , राजू भिसे आणि मेकेन्झी डाबरे यांचे सहकार्य लाभले. तसेच शिबिराच्या आयोजनासाठी निंबारे मामा यांनी आपली जागा उपलब्ध करून वेळोवेळी मदतीचा हात दिला.
वस्तीतील लोकांनी या शिबिराला खुप चांगला प्रतिसाद देत अशा प्रकारची शिबिरे नजिकच्या काळात आयोजित करण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली.

