
पालघर :भारतीय खाद्य निगमच्या ( FCA ) बोरिवली येथील गोडाउन मध्ये ,हजारो कामगार लोडिंग -अनलोडीग कामासाठी हजारो कामगार काम करीत आहेत ,पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना ह्या लोडींग अनलोडीग कामा मध्ये सामावून घ्यावे ,अशा सूचना भारतीय खाद्य निगम बोरीवली येथील डिव्हिजनल मॅनेजर श्रीमती बिना एका मॅडम यांना खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी दिल्या.
पालघर जिल्ह्यात रेशनिंग दुकानावर मुबलक धान्य मिळावे व ते धान्य वेळेवर ती मिळावे म्हणून खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी भारतीय खाद्य निगम अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे ,भारतीय खाद्य निगम चे डिव्हिजनल मॅनेजर श्रीमती बीना एकका , मॅनेजर कॉलिटी कंट्रोल सोमण राज ,जिल्हा पुरवठा खात्याकडून प्राची पानदिलवार हे उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात साधारणपणे अंतोदय योजनेसाठी ९४०० क्विंटल गहू व २३५०० क्विंटल तांदूळ महीन्याला लागत असतो. तसेच प्राधान्य रेशन कार्ड धारकांसाठी २९३४० क्विंटल गहू व ४४०१० क्विंटल तांदूळ लागत असतो ,हे सर्व धान्य भारतीय खाद्य निगम यांच्या बोरीवली, भिवंडी व नवी मुंबई ह्या गोडाऊन मधून येत असते, हे धान्य वेळेत मिळावे म्हणून सर्व धान्य बोरिवली येथील गोडाऊन मधून देण्यात यावं अशाही सूचना खासदार गावित यांनी दिल्या. तसेच पालघर जिल्ह्यातील जनतेसाठी धान्याचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी .
जेव्हा रेल्वेने आलेले धान्य भारतीय खाद्य निगमच्या गोडाउन मध्ये उतरवून घेत असतात ,तेव्हाच जिल्ह्यातील ट्रक धान्य घेण्यासाठी जातात त्यामुळे त्या ट्रकना थांबावे लागते, म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी व भारतीय खाद्य निगम यांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांसोबत लोडिंग अनलोडींग साठी ताळमेळ ठेवावा य अशा सूचना खासदारांनी दिल्या .
जिल्ह्यातील अनेक बचत गट अन्नपदार्थ बनवित त्यांना धान्य व्यापार्यांकडून घ्यावे लागते त्यांनाही थेट भारतीय खाद्य निगम मधून धान्य मिळावे असे खासदार म्हणाले.