
वसई(प्रतिनिधी)- दिनाक ०२/१२/२०२१ दुपारी दोन वाजता नंदकुमार महाजन यांनी आपल्या मोटर सायकल मध्ये दोन लिटर पेट्रोल भरले कार्ड पेमेंट २१९-५० पैसे भरले त्या नंतर काही अंतर पुढे गेल्यावर पेट्रोल काटा दाखवत नाही तेव्हा थोडा संशय आला संध्याकाळी सात वाजता पुन्हा पेट्रोल पंप वर जाऊन चौकशी केली तर आमची सिस्टीम मध्ये पेट्रोल भरले असल्याचे दाखवत आहे. या बाबत नंदकुमार महाजन यांनी कंप्लीट बुक ची मागणी करून रीतसर तक्रार रजिस्टर मधे नोंद केली . गाडी अगोदर पासून रिझर्व्ह असल्याने त्यांनी आज पुन्हा स्टेला पेट्रोल पंप वर दोन लिटर पेट्रोल भरले त्यांचें माप मीटर व्यवस्थित असल्याने गाडीचा पेट्रोल काटा नेहमी प्रमाणे वर आला या वरून आपली फसवणूक झाली असल्याचे खात्री झाल्याने त्यांनी आज पुन्हा भारत पेट्रोलियम कंपनी ला रीतसर तक्रार केली आहे मागील अनेक महिन्यापासून सगरशेत पेट्रोल पंप चालक ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे चर्चे द्वारे ऐकण्यात येत होते . पणं पेट्रोल पंप चालक व कर्मचारी संगनमताने वाहन चालकांची मीटर मध्ये हेराफेरी करून लूट करीत असल्याचे समजले आहे तरी सर्व नागरिकांनी या बाबत दक्ष राहुन आपणं दिलेले पैसे इतके पेट्रोल भरले की नाही याची खात्री करावी. या बाबत भारत पेट्रोलियम कंपनी कडे रीतसर तक्रार केली आहे व त्याचा पाठपुरावा करून या सागरशेत पेट्रोल पंप वर या चोरी फसवणूक विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पेट्रोलियम मंत्री मंत्रालय पर्यंत ईमेल द्वारे पाठपुरावा करण्यात येइल