
(जयंती पिलाने)उरण: उरण येथील द्रोणागिरी किल्याच्या पायथ्याशी शोध कार्यात एक घडीव प्राचीन बागडी तोफ सापडली आहे. 12 व्या किंवा 13 व्या शतकातील ही तोफ असावी असा अंदाज दुर्ग अभ्यासक जयकांत शिंक्रे यांनी गाववाल्याशी विचारपूस करुन आणि एका अंदाजावरून व आराखडा आखून तोफेचे खोद काम करण्यात आले आणि त्या जागी तोफ आढळून आली. या मोहिमेत महत्वाची कामगिरी बजावणारे शिव संवर्धन संस्था शिवराज युवा प्रतिष्ठान यांच्या सर्व मावळ्यांनी व त्यांचे मुख्य मार्गदर्शक अपरिचित गडकोट शोध, दुर्ग अभ्यासक जयकांत शिंक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध मोहीम या परिसरात लावली आणि तब्बल कित्येक महिन्यापासून खूप मोठा इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच एका मोठ्या गटारांमध्ये साधारण साडेसात फूट लांब आणि अडीच टन वजनाची एक भली मोठी बांगडीच्या आकाराची तोफ मिळाली. कित्येक वर्षांमध्ये या ठिकाणी गटार रस्ता चिखल दलदल याच्या खाली साधारण 10 ते 12 फूट खाली तोफ गाडली गेलेली होती. काही स्थानिकांना याबद्दल माहिती असल्याने त्यांनी अनेक वर्षापूर्वी ही तोफ पाहिल्याची नोंद होती याचा शोध दुर्ग अभ्यासक जयकांत शिंक्रे व स्थानिक शिवप्रेमी उरणकर यांनी घेतला आणि मातीत गाडलेला शेकडो वर्षांचा इतिहास साऱ्या जगासमोर आणून या तोफेला एक मोकळा श्वास दिला आहे. इतिहासाचे जतन आणि संवर्धन हे प्रत्येक शिव भक्ताचे, इतिहास प्रेमींचे आणि प्रत्येक स्थानिक ग्रामस्थांचा अधिकार आहे कर्तव्य आहे हे सर्व जगाला कळावं हा संदेश शिवराज युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व उरंणकर यांनी सर्व जगाला दिलेले आहे. लवकरच पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शन आणि स्थानिकांच्या समितीच्या निर्णयांनी या तोफेचे एक मोठे स्मारक बनवून भविष्यामध्ये हा इतिहास जगाला कळावा यासाठी प्रयत्नशील असेल तसेच सदर तोफ ही भारतीय पुरातत्व विभागाच्या सुचने प्रमाणे ताब्यात घेण्यात येईल असे शिवराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश ठाकूर यांनी सांगित आहे.
महाराष्ट्राला खूप मोठा प्राचीन इतिहास लाभलेला आहे. त्यापैकी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानीचा ठेवा या जिल्ह्याला दिला तोच हा जिल्हा रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महाराष्ट्रातील एक बलदंड डोंगरी व सागरी असा मिश्र किल्ला म्हणजेच द्रोणागिरी किल्ला प्राचीन काळापासून सागराचे महत्व व समुद्राचा होणारा व्यापार यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ल्याची निर्मिती केली गेली त्यापैकीच एक द्रोणागिरी किल्ला याच किल्ल्याच्या रक्षणासाठी सात वाहनापासून आपल्याला काही खाणाखुणा या किल्ल्याच्या परिसरात मिळतात शिलाहार राजा भोज व महादेव देवगिरीचे यादव यांच्या मध्ये झालेले घनगोर सागरी युद्ध हे या द्रोणागिरीला साक्षी आहे. याच सागरामध्ये शिलाहार हे घराणे शेवटचे नष्ट झाले आणि याच सागराचे महत्व जाणून कधी एकेकाळी शेकडो वर्षापूर्वी या द्रोणागिरीच्या रक्षणासाठी या परिसरात पूर्णपणे तटबंदीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात कालांतराने पोर्तुगीजांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर केला गेला पण मराठ्यांच्या पराक्रमाने वसई मोहिमेच्या वेळी या किल्ल्यावरती स्वराज्याचा भगवा ध्वज शेवटचा कायमस्वरूपी फडकला याच किल्ल्याच्या रक्षणासाठी अनेक वास्तू आज मातीखाली गाढलेल्या आहेत. काळाच्या ओघात हा इतिहास कुठेतरी मागे चाललाय यासाठी स्थानिक दुर्ग संवर्धन संस्था यांनी आजपर्यंत संवर्धन जतन जनजागृती स्वच्छता मोहीम अशी कितीतरी उपक्रम स्थानिक दुर्गसंवर्धन संस्थाने आजपर्यंत राबवलेले आहेत.