
आज सोमवार दिनांक ०६/१२/२०२१ रोजी पापडी हेमीकलास बिल्डिंग चोबरे रोड येथे बिस्मिल्लाह महिला बचत गट पापडी व शस्ती वस्ती आधार संघ तर्फे “ई-श्रम कार्ड” नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ई-श्रम कार्ड ही एक महत्वकांक्षी योजना केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयमार्फत राबविले जात आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकार च्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड सुरू केलं आहे.
विशेषतः कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
ई-श्रम कार्ड असलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे. तसेच अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, असंघटित कामगारांनी ई-श्रम काढून घ्यावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
मोफत ई श्रम कार्ड नोंदणी आणि सामान्य नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
तर असंघटित कामगारांनी ई-श्रम कार्ड काडून घेतले.
यावेळी बिस्मिल्लाह महिला बचत गट, पापडी चे अध्यक्षा मा. शमीम फिरोज खान,सदस्य मा.शहनाज खान, मा. रुबिना कुरेशी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक मा. अभिलाषा वर्तक, मा.शुभांगी शिवागड , मा.श्रुती साळुंखे, मा.हार्दिक नाईक, मा. शालिनी डिसुझा मा.जिगण्यासा नाईक महिला सह शक्ती करण शोषल ग्रुप यांचे व गरीब जनतेचा शेसल ग्रुपचे अध्यक्ष मा.जेरी मच्याडो यांचे बिस्मिल्लाह महिला बचत गट तर्फे आभार मानले.
