
वार्ताहर – संपूर्ण भारतात दिनांक १० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान ग्वालियर , मध्यप्रदेश येथे NCC शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातील नागले गावातील यश अनिल पाटील यांनी संत गोंसलो गार्सिया महाविद्यालय च्या माध्यमातून सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून २८ व संपूर्ण भारतातून २४८ NCC चे कॅडीट यात सहभागी झाले होते. यश याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत “खडक चढणी व गोळीबार” स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. शिबिरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची संस्कृती यावर आधारित कार्यक्रमात सहभागी झाले.
लेफ्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांनी प्रेरणादायी विचार सर्व सहभागी NCC कॅडीट समोर व्यक्त केले. सदरचे NCC शिबिर हे कर्नल अरविंद दास यांच्या निरीक्षणाखाली पार पाडले. छोट्याश्या गावातील एक होनहार मुलगा देश पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो ही नक्कीच नागले वासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे सर्व स्तरातून “यश”च्या यशाचं कौतुक होत आहे.