
यासिन भाई चोटालिया व मदन गोपाळ शेठ याना महसूल प्रशासन नोटीस कधी काढणार ?
वसई(प्रतिनिधी): दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी पोमन येथे महसूल प्रशासन ने दिखावी करावी केली या कारवाई मध्ये यासिन भाई चोटालिया व मदन गोपाळ शेठ यांची बांधकामांना प्रशासन ने कारवाई केली नाही त्यामुळे तेथील स्थानिकांना प्रश्न पडला आहे की महसूल प्रशासन यांच्यावर एवढे मेहेबान का ?
वसई तहसील अंतर्गत पोमण ग्रामपंचायत हद्दीत पोमण भूमापन क्र. 199 उप विभाग क्र.1, भूमापन क्र.8 उपविभाग क्र.1 भूमापन क्र.9 या भूखंडावर यासिन भाई चोटालिया व मदन गोपाळ शेठ यांनी प्रचंड अनधिकृत बांधकामे केली असून सदरची बांधकामे निष्कासीत करून बांधकामधारकावर एमआरटीपी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी तक्रार दाखल केले आहे,दि.25-11-21 रोजी दाखल तक्रारी वर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. पालघर जिल्हाधिकारी कार्यलयाकडून सदरची तक्रार वसई तहसील कार्यलयास पाठविण्यात आली आहे. तहसीलदार कार्यलयातील संबंधित अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन मोठा भ्रष्ट्राचार केला सदर बाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून सखोल चौकशी करून संबधीत अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार व शिस्तभंगाची कारवाई व्हावी