प्रभाग समीती एफ अंतर्गत रिचर्ड कम्पाउंड मधील समशेर नामक विकासकाचे ७०००० ते ८०००० sqft अनधिकृत बांधकाम ?

वसई- अनधिकृत बांधकामे आणि प्रभाग एफ समिती चे जन्म जन्मो चे संबध आहेत हे काही नव्याने परिचय करण्याची गरज नाही,उच्च न्यायालयाने महापालिकेला ९००० बांधकामांबद्दल खडे बोल सूनवुनही प्रभाग समिती एफ चे अधिकारी ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखी संकल्पना स्पष्ट करत आहेत,सुमारे ९००० हजार अनधिकृत बांधकामानं पैकी एकट्या एफ प्रभागात ४२८९ एवढी अनधिकृत बांधकामे झाली आहेत असे वृत्त महापालिकेतील मासिक अहवालात स्पष्ट झाले आहे.महापालिकेचे आयुक्त झोपेचे सोंग घेऊन स्वस्थ बसलेले आपण पाहिले आहे.लाज शरम विकून निर्लज्जपणे अनधिकृत बांधकाम विकासकांना हाताशी बाळगत आहेत.प्रभाग एफ मध्ये अनधिकृत बांधकामे वाढवण्यासाठी च आयुक्तांनी राजेंद्र कदम यांची नियुक्त केली आहे असे प्रभाग एफ मध्ये वाढती अनधिकृत बांधकामे बघता दिसून येते.

सध्याचे ताजे उदाहरण वसई महामार्गावरिल प्रसिद्ध विकासक समशेर याचे सुमारे रिचर्ड कम्पाउंड मधील ७०००० ते ८००००sqft इतके भले मोठे अनधिकृत बांधकाम.हा विकासक गेले कित्येक वर्षे अनधिकृत बांधकामे उभारत आहे.विकासकाला कसलीही भीती नाही .आपल्या डोक्यावर लोकप्रतिनिधी आणि सहआयुक्त यांचा आशीर्वाद आहे असा सगळीकडे प्रचार करत आहे.आतापर्यंत या विकासकाने अनधिकृत बांधकामे आणि अधिकारी संबंध या विषयावर पीएचडी केली असेल, असे लक्षात येते.आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे वाढवण्यासाठी सहआयुक्त यांना हाताशी ठेऊन संपूर्ण काळाबाजार चालवत आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.असे स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *