
नालासोपारा(प्रतिनिधी)- आज आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ वा अभिष्टचिंतन सोहळा नेहरू सेंटर मुंबई येथे संपन्न झाला. ह्याचे व्हरचुल रॅलीचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक ह्यांनी गॅलेक्सी हॉटेल नालासोपारा (प)येथे केले होते ह्या व्हरचुयल रॅली ला वसई विरार जिल्हानिरीक्षक मा आमदार आनंदभाई ठाकुरसाहेब हे उपस्थित होते
साहेबांचे देशाच्या व राज्याच्या प्रगतीमध्ये असलेले योगदान अतिशय मोठे आहे. सहकार, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण या क्षेत्रात अभ्यासपूर्ण असलेला वावर व आपल्या योगदानाच्या माध्यमातून या क्षेत्रांच्या मध्ये केलेले कार्य उत्तुंग आहे.
अशा या जाणत्या नेतृत्वाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्य व्हरचुल रॅलीस वसई विरार शहर जिल्ह्यातील पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक,पक्षाचे जिल्हा पदाधिकारी फ्रंटल सेल चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा ही आम्हा कार्यकर्त्या साठी अभिमानास्पद बाब आहे.
ह्या सोहळ्यात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, फ्रंटल सेल प्रमुख, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते