
कन्सेप्युअल अडवायसरी सर्व्हिसेस एल एल पी यांना नोटिसा पलीकडे कारवाई नाही?
वसई(प्रतिनिधी):पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी, गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे राजावली येथे अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे प्रकरणी वसई तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. तहसील कार्यालयाने नोटीस बजावली असून कन्सेप्चूअल एडवायजरी सर्विसेस ने नोटीसला उत्तरच दिलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की,पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी, गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे राजावली सर्वे नंबर ८७/५ अ, ८७/५ ब, १८५/९ या भूखंडावर बेकायदेशीर उत्खनन करून सर्वे नंबर ९१, ९२, ९३, ९५, ९६, ९८, ४५/१, ४५/३, ५७, ५८/४, ५८/५, ६२, ६४, ६३/५, ६६, ५४, ५५, ५६, १७, १८, १९, २०, १४, ३२ या भूखंडावर अनधिकृत दगडमातीचा भराव केल्याप्रकरणी दि. २३/८/२०२१ रोजी तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. सदर प्रकरणी दि. ३१/८/२०२१ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र सदर प्रकरणी पुढे कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाई का झाली नाही याची चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
अवैध माती भराव केलेल्या सदर भूखंडावर अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. सदरच्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करून बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्याने गुन्हे दाखल करावेत.