
प्रतिनिधी : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तहसील हद्दीतील गाव मौजे पौमन येथील भूमाफिया पद्मश्री गजरा याने तलाठी गणेश पाटील यांना कार्यालय दिले असून गणेश पाटील तलाठी कार्यालयात न बसता पद्मश्री गजराने दिलेल्या कार्यालयात बसलेले दिसतात. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कारवाई करावी.गाव मौजे पोमण सर्वे नंबर १६४/१ व १६२/१ या भूखंडावर केलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी रॉयल इंड हब तर्फे पद्मश्री कल्याणजी गजरा, हरेश्वर रामजी भानुशाली, जगदीश बाबुराव जाखड यांना उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र सदर प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. या ठिकाणी सदर भूमाफियांनी तलाठी गणेश पाटील यांना कार्यालय दिले आहे. उप विभागीय अधिकाऱ्यांना ही भूमाफियांनी लाच देऊन कारवाई थांबविली आहे. परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. कारवाई करावीच लागणार. कशी होत नाही ते पाहू. कोणा कोणाला पैसे पोहोचवता ते पाहू.