
दिनांक 10 डिसेंबर रोजी महानगरपालिकेतर्फे दिलेल्या लेखी आश्वासनानुसार शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयात अति. आयुक्त संतोष देहेरकर, उपायुक्त किशोर गवस, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, पाणीपुरवठा अधिकारी सुरेंद्र ठाकरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी तसेच विरार पोलीस ठाण्यातील प्रतिनिधी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. प्रामुख्याने दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील “सर्वधर्मीय दफनभूमी” ज्याची पर्यावरण विभागाकडून (MCZMA) कडून पर्यावरण विषयक परवानगी जी 18 जुलै 2018 मध्ये मिळालेली असूनही आजपर्यंत दफनभूमी दिली गेली नव्हती. परंतु 10 डिसेंबर रोजीच्या “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक व सहकारी” यांच्या दणक्यामुळे दिनांक 15 डिसेंबर रोजी या सर्वधर्मीय दफनभूमीच्या सुरक्षाभिंत व इतर कामासाठी सुमारे 1 करोड 75 लाख रुपयांची निविदा जाहीर केलेली आहे. पुढील दिड ते दोन महिन्यात ही सर्वधर्मीय दफनभूमी पूर्ण करणार असल्याचे या बैठकीत महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले.
तसेच 69 गावांची पिण्याच्या पाण्याची योजनेसंदर्भात महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दोघांकडे योग्य माहितीच नसल्याचे निष्पन्न झाले तसेच परिवहन सेवा आणि एस टी महामंडळाची परिवहन सेवा आणि बुडण्याऱ्यां वसईसाठी आई आई टि ( IIT ) व निरी (NEERI) तर्फे सुचविण्यात आलेल्या उपाययोजनेसाठी सुमारे 295 कोटी रुपयांची तरतुदीप्रमाणे कामाची लवकरच पूर्तता कशी होणार याबद्दल सविस्तर चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांच्यासोबत दिवाणमान येथील “सर्वधर्मीय दफनभूमीसाठी” सातत्याने उपोषण आणि पाठपुरावा करणारे के जी एन वेल्फेअर सोशल असोसिएशनचे अध्यक्ष कल्लन खान, ऍड खालिद शेख, महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे सचिव टोनी डाबरे, अम्मार पटेल व आमिर देशमुख, वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष डेरीक फुरटॅडो, काँग्रेसचे नेते हर्षद खंडागळे व तारिक खान आणि सामाजिक कार्यकर्ते जोएल डाबरे, दर्शन राऊत, संदीप किणी व पंढरीनाथ पाटील उपस्थित होते.
