
पालघर दि.23- मुंबई-अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील बाधीत होत असलेल्या गावांमध्ये नॅशनल हायस्पीड रेलकॉपोरेशन लि. (NHSRCL) सामाजिक उत्तरदायित्य (CSR) फंडामभुन पालघर जिल्ह्यातील प्रकल्पवधीत गावामध्ये गाव विकास कामे करण्यासाठी गाव विकास निधीचे वितरण करण्यात आले आहे.
पालघर तालुक्यातील विराथन खुर्द, हनुमान नगर, पडघे, रोठे, अंबाडी आणि वसई तालुक्यातील नागले. पोमण, आणि चंद्रपाडा ग्रामपंचायतीला पहिल्या टप्प्यामध्ये निधीचे वितरण जिल्हाधिकारी पालघर डॉ. माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.
विकासकामे पुढील प्रमाणे आहेत:
विराथनखुर्द:- ग्रामपंचायत ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रोड कांक्रीटीकरण 25 लक्ष, हनूमान नगर:- जिल्हा परिषद शाळा हनूमान नगर येथे वर्ग खोली बांधणे 14 लक्ष, पडघे:- ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेड बांधकाम 10 लक्ष, रोठे (मायखोप) :- श्री रामचंद्र पाटील कला मंदीर स्टेज रस्ता डांबरीकरण करणे 15 लक्ष, अंबाडी (शेलवाली) :-समाज मंदीर बांधणे व गावमंदीर सिमेंट रस्ता क्रॉक्रीट 15 लक्ष, नागले :- फणसपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे 14 लक्ष, पोमण :- सोलरहायमास्क उभारणी करणे 13 लक्ष, चंद्रपाडा :- पत्र्याचे छत व संरक्षण भिंत बाधंकाम करणे 14 लक्ष सदर विकासकामांना मंजूरी दिल्यामुळे संबधित गावाच्या विकासात भर पडणार आहे NHSRCL मार्फत पूढील टप्प्यात बुलेट ट्रेन मार्गीकेमधील उर्वरित गावांना विकासनिधी मंजूर करण्यात येणार आहे.