सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या लिखित अश्वासनांतर आमरण उपोषण तृतास स्थगित

जव्हार:- उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जव्हार मार्फत जुन्या एसटी स्टँड जव्हार येथे संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. सदरचे संरक्षण भिंतीचे बांधकाम ठेकेदारास देण्यात आले असता, संरक्षण भिंत बांधताना सदर संरक्षण भिंतीला अनधिकृत बेकायदेशीरपणे शासकीय निधीचा गैरवापर करून व्यापारी गाळा बांधण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता डी. डी. पाटील ,संबंधित ठेकेदार यांनी सदरचे संरक्षण भिंतीचे व गाळ्याचे बांधकाम करताना नगरपरिषद जव्हार यांची रीतसर परवानगी न घेता अनधिकृत बेकायदेशीरपणे गाळ्याचे बांधकाम केले आहे. सदरचे अनधिकृत गाळ्याचे बांधकाम होत असताना नगरपरिषद जव्हार यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही याचा अर्थ सदरचे बांधकाम संगनमताने झाले आहे असे आरोप जनसामान्य जनतेतून होत असताना , या अनधिकृत बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्या विरोधात दलित पँथर संघटनेने दिनांक 3/8/2021 रोजी सदर अनधिकृत गाळा तोडण्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले होते. परंतु तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग जव्हार मार्फत न झाल्याने दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी दुसरे पत्र देऊन सदर अनधिकृत गाळा त्वरित निष्कशीत न झाल्यास दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी आमरण उपोषण करीत असल्याचे पत्र सार्वजनिक बंधकाम उपविभाग नवनियुक्त उपअभियंता विजय भदाणे तसेच नगरपरिषद जव्हारचे मुख्याधिकारी वैभव आवारे याना प्रत्येक्ष भेटून देण्यात आले होते. त्याप्रमाणे नियोजित तारखे व वेळेनुसार उपविभागीय कार्यालय जव्हार येथे दलित पँथरच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. उपोषण दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस आयचे जव्हार तालुका अध्यक्ष संपत पवार ,व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार बंधू यांनी उपोषण करत असलेल्या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जव्हारचे सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी शिंग यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे विजय भदाणे यांच्या उपस्थितीत दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत याना प्रत्येक्ष चर्चेसाठी प्रांत कार्यालय येथे बोलावून महिनाभराच्या कालावधीत संबंधित अनधिकृत गाळा निष्कशीत करण्याचे लिखित पत्र उपअभियंता विजय भदाणे यांना उपोषणकर्त्यांना देण्याचे आदेश दिले असता , सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता विजय भदाणे यांनी प्रत्येक्ष उपोषण करीत असलेल्या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांना महिन्याभरात कारवाईचे हमीपत्र दिले असता दलित पँथरच्या वतीने आमरण उपोषण तृतास स्थगित करण्यात आले. तसेच उपोषणकर्ते दलित पँथरचे जिल्हा संघटक लहानु डोबा , जिल्हा उपाध्यक्ष वसीम काजी , मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा , जिल्हा प्रमुख सल्लागार सदाशिव घारे यांना उपाभियंता विजय भदाणे यांनी पाणी पिण्यास देऊन पँथरच्या वतीने उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये पालघर जिल्हा सचिव व सहसंपर्क प्रमुख शिवप्रसाद कांबळे , डहाणू तालुका अध्यक्ष विनायक जाधव , मोखाडा तालुका महासचिव कल्पेश लोखंडे ,जव्हार तालुका महासचिव विजय वरठा , जव्हार तालुका उपाध्यक्ष उमेश जंगली, रेवजी गोंड, बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे , विकास सिंग , गोवणे विभाग प्रमुख सुदाम दामले , सामाजिक कार्यकर्ता
सुनील भांगे व जव्हार मोखाडा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *