वसई शहरातील एकमेव सरकारी मनपा रुग्णालय आहे सर डि एम पेटिट त्या ठिकाणी वसई तालुक्यातील रोज शेकडो लोक विश्वासाने उपचारांसाठी येत असतात, मा. आयुक्त साहेबांनी मनपा दवाखान्याची विस्तार इमारत बांधण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना मनपाची सुविधा मिळावी म्हणून मंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभ केला.
नवीन इमारतीचे नकाशाची जाहिरात मोठ्या प्रमाणात केली.
पण आज वर्ष उलटुन गेले नवीन इमारतीचे काम बंद आहे….?
बांधकाम विभागाच्या संगनमताने चालढकल सुरू आहे.
आज अनेक रुग्ण बेड नसल्या मुळे आर्थिक अडचणीला सामोरं जात आहेत.
जनतेचे होणारे हाल, मनपाच्या बांधकाम विभागाचे संगनमत याचा पंचनामा जनते समोर मांडण्यासाठी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस तर्फे श्री विजय पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, कॅप्टन निलेश पेंढारी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, श्री ओनिल अल्मेड सर जिल्हाध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस यांचे नेतृत्वात डि एम पेटिट रुग्णालया समोर आंदोलन करणार आहे.
जनतेला विंनती आहे आपण सहभागी होऊन मनपा बांधकाम विभागाला जागे करू या व आपल्या हक्काचे रुग्णालय उभे करण्यासाठी लढू या…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *