
मयुरेश वाघ यांनी घेतली मंत्री श्री. रामदास आठवले यांची भेट
भारताचे सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री. रामदास आठवले साहेबांची पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांनी नवी दिल्लीत त्यांच्या बंगल्यावर नुकतीच भेट घेतली. यावेळी आठवले साहेबांशी विविध विषयांवर १५ मिनिटे चर्चा झाली.
भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा वसई तालुक्यात उभारावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मयुरेश वाघ यांची मागणी आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , विपश्यना केंद्र, त्यांच्या नावे भव्य ग्रंथालय अशी विविध कामे वसई तालुक्यात मंजूर होण्याबाबत आठवले साहेबांना मयुरेश यांनी विनंती केली व त्यावर चर्चाही झाली. ही सर्व कामे होण्यासाठी योग्य त्या जागेचा शोध घेऊन तसा प्रस्ताव तयार केल्यानंतर पुढील कामे मार्गी लागू शकतात.