
मे. बेस्ट आय टी वर्ल्ड (इं) प्रा. लि. प्रशासनाच्या संचालकानी महाराष्ट्र सरकारमधील कामगार मंत्री महोदय तसेच मा. कामगार उपायुक्त पालघर, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांची सातत्याने दिशाभूल करून ६२ कामगार व त्यांचे कुटुंबीय यांची फसवणूक करणाऱ्या मे. बेस्ट आय टी वर्ल्ड (इं) प्रा. लि. प्रशासनाच्या संचालकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सर्व ६२ कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनवर उपासमारीची वेळ आणल्यामुळे सर्व ६२ कामगार आमच्या बायका, मुलांसहित त्यांच्या सहपरिवारला इच्छामरणाला परवनागी मिळणेसाठी आज दिनांक २४.१२.२०२१ रोजी आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. कैलास हरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी मंत्रालय येथे जाणार होतो..
परंतु राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे व जमाबंदी लागू असल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मंत्रालयात जाण्यास मज्जाव केला व सर्व आंदोलनकर्त्यांना आगरीसेना कार्यालयाच्या गेट समोरच अडवण्यात आले. मा. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर साहेब यांनी यशस्वी मध्यस्ती करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली व कामगार उपायुक्त यांच्याशी चर्चा करत ८ दिवसांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
पोलीस प्रशासन व कामगार उपायुक्त कार्यालय यांच्या विंनतीचा मान ठेवून आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे..जर कामगारांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर आगरी सेना भविष्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल