प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ च्या सहाय्यक आयुक्त पदी मनोज वसंत वनमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र कदम यांनी आपल्या कार्यकाळात अंदाधुंद भ्रष्टाचार करून बेफाम काळी माया जमविली. राजेंद्र
कदम यांना हटवून त्यांच्या जागी ज्या मनोज वसंत वनमाळी यांना बसविण्यात आले ते मनोज वसंत वनमाळी राजेंद्र कदम यांच्या प्रमाणेच महा भ्रष्टाचारी आहेत.
प्रभाग समिती हद्दीत हजारोंच्या संख्येने अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एकूण ९ प्रभाग व २ विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रामधील अनधिकृत बांधकामांचा विचार करता प्रभाग समिती एफ मध्ये सर्वाधिक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. सदर अनधिकृत बांधकामांचे चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल शासनाकडे पाठविले जातात. सरकारलाही एकूण अनधिकृत बांधकामांबाबतची स्थिती माहीत आहे. प्रती चौरस फूट २०० रुपये प्रमाणे पैसे वसुली करून मंत्रालयापर्यंत लाचेची रक्कम पोहोचविली जाते. त्यामुळे तर मंत्रालयातून अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळते.
राजेंद्र कदम यांच्या जागेवर सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केलेले मनोज वनमाळी कोणते दिवे लावतात, ते लवकरच कळेल. अत्यंत भयंकर भ्रष्टाचार चाललेला असून न्यायालयाकडून ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत या स्थितीत कोणताही फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. या भ्रष्टाचाराला कोणी एक जबाबदार नसून संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट आहे. अनधिकृत बांधकामे झाली नाहीत तर मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या तिजोऱ्या कशा भरणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *