जन्मदिवस युवानेतृत्वाचा…..!

                   

“तुम्ही झालात परिस्थितीवर स्वार,
आणि घडविलात नवा इतिहास,
तुम्ही झालात जनसामान्यांचे नेते,
अन् बनलात महाराष्ट्रातील लोकप्रिय युवानेते.”
या काव्यपंक्ती प्रमाणे ज्यांची ओळख समग्र महाराष्ट्रात निर्माण झाली असे आमुचे मार्गदर्शक व परमस्नेही, महाराष्ट्रातील नवतरुण लोकप्रिय युवानेते, तरूणांचे आधारस्तंभ, जनसामान्यांचे असामान्य नेते, शांत, संयमी, नम्र, सुशिक्षित, सुसंस्कृत व अभ्यासू, उच्चविद्याविभूषित असं तरूण नेतृत्व वा महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस सरचिटणीस तथा देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकमान्य लाडके आमदार मा. जितेश भाऊ अंतापूरकर यांचा आज जन्मदिवस……..!

           मा.जितेश भाऊ अंतापूरकर म्हणजे श्रीमती. शितलताई व दिवंगत आमदार रावसाहेबजी अंतापुरकर यांच्या उदरी *३० डिसेंबर* रोजी  जन्माला आलेलं एक थोररत्न होय. ज्यांनी *"राजकारणातील देवमाणूस-स्व.रावसाहेबजी अंतापुरकर"* यांच्या स्वप्नांचा व महत्वकांक्षी प्रकल्पाचा वारसा आपल्या  खांद्यावर तुम्हा-आम्हांच्या आग्रहास्तव विश्वासाने स्वीकारलेले, महाराष्ट्रातील तरूण, तडफदार, झुंजार स्थानिक युवा आमदार होत.  स्व.रावसाहेबजी अंतापरकर साहेब यांच्या रूपाने देगलूर बिलोली मतदारसंघाला एक स्थानिक खंबीर नेतृत्व बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर प्राप्त झाले होते. त्यांच्यासम 'देवमाणूस' राजकारणात होणे नाही. पण काळाला ते देखवले नाही. त्यांच्या अकाली दुःखद निधनाने अंतापुरकर परिवारासह समग्र देगलूर-बिलोली तालुका पुन्हा पोरका झाला. त्यामुळे अंतापुरकर कुटुंबीयांसमवेत देगलूरकरांचेही कधीच भरून न निघणारे नुकसान झाले हे अटळ सत्य आहे. अशा विदीर्ण, वैशम्य अवस्थेत समाजकारण, राजकारण व शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले, पितृछत्राच्या छायेखाली पडद्यामागून समाजातील सर्व गोर-गरीब जनतेचं सतत कामं करणारे पण प्रत्यक्षात प्रसिध्दीच्या प्रकाशझोतापासून अलिप्त असलेले *मा. जितेश भाऊ अंतापूरकर* परिसरातील जनतेच्या अग्रहाखातर आपल्या पित्यांच्या विचारांचा, संस्काराचा व कार्याचा वारसा घेऊन *माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.अशोकरावजी चव्हाण साहेब, मा.प्रा.डाॅ.यशपाल भिंगे, आमदार अमर राजूरकर, आमदार  मोहन अण्णा हंबर्डे, मा.आ.डी.पी.सावंत* आदी मान्यवरांच्या खंबीर पाठबळामुळे पुढे आले. व स्वतःला फार श्रेष्ठ, मुरब्बी, मातब्बर, दिग्गज व अनुभवी समजणाऱ्या विरोधी नेत्यांना चारीमुंड्या चित करत दणदणीत *४१,९१७ एवढ्या प्रचंड मताधिक्याने "विजयश्री"* प्राप्त केले. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून खरे तर देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील सूज्ञ जनतेला स्थानिक खंबीर युवा नेतृत्व निवडण्याची व खऱ्या अर्थाने स्व.रावसाहेबजी अंतापुरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून, लोकशाहीतील आपल्या अमूल्य मतदानाच्या हक्काने पुन्हा एकदा आमदार *मा. जितेश भाऊ अंतापूरकर* यांच्या रूपात आपल्या हक्काचा स्थानिक, अभ्यासू, अनुभवी, विनयशील, सक्षम असा युवा प्रतिनिधी विधीमंडळात पाठवण्याचे भाग्यच लाभले.  

          स्व.रावसाहेब अंतापुरकर हे देगलूर तालुक्यातील अंतापुर या छोट्याशा गावात अतिशय सर्वसामान्य कुटुंबात वाढलेले, जेथे पोटाचा व शिक्षणाचा प्रश्न गंभीर होता पण परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण पुर्ण करुन मुंबई सारख्या ठिकाणी अभियंत्यांची चांगली नौकरी हस्तगत करून जीवनाला सुरुवात केली. पण गावाकडे 'नाळ' जोडलेली असल्यामुळे  मनाला स्वास्थ्य मिळत नव्हते. येथे माझा, माझ्या परिवाराचा विकास करू शकतो पण माझ्या परिसराचं व समाजाचं काय? 'आपण समाजाचं काही तरी देणं लागतो, समाजासाठी, परिसरासाठी आपल्याला काही तरी करावयास हवे' या उदात्त आणि व्यापक विचाराने मुंबई येथील चांगली नोकरी सोडून, घरदार व आहे नाही ते सर्व विकून "समाजसेवेच्या" ध्येयाने प्रेरित होऊन कोणताही राजकीय वारसा नसताना २००७-०८ ला राजकारणात आलेले २००९ साली प्रथमतः आमदार म्हणून निवडून आले. प्रथमतःच राजकारणात आल्यामुळे येथिल राजकारण व प्रस्थापित व्यवस्थेला जुळवून घेत विकासकामाच्या रंगवलेल्या स्वप्नांना मुर्तरूप देण्यासाठी सदोदीत प्रयत्नशील राहिले. तरीही २०१४ ला अल्पशा मताने पराभवाला सामोरे जावे लागले. पण मूलतः राजकारणात येण्याचा ज्यांचा हेतूच शुद्ध असल्याने पराभवाने खचून न जाता व त्याची चिंता न करता प्रत्येकाच्या सुख-दु:खात मनापासून सहभागी होत अविरतपणे आपलं कार्य त्यांनी चालू ठेवले. जनतेने त्यांची समाजाप्रती व कार्याप्रती असणारी खरी निष्ठा ओळखून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाची, सहकार्याची जाण ठेवून २०१९ ला पुन्हा आमदार पदी विराजमान करून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. दोन-अडीच पंचवार्षिक योजना जनतेची सेवा करतांना आपलं स्वतःचं 'साधं घर' तरी असावं असा साधासा व्यवहारिक विचारही न करता किरायाच्याच घरात शेवटपर्यंत राहिले. पद, पैसा, प्रतिष्ठा यांचा कधी गवगवा न करता आपलं आयुष्य जगले. पद असताना व नसताना पदाचा गर्व केला नाही, आपला नंम्रपणा सोडला नाही व चांगल्या विचारांपासून कधीच ढळले नाहीत. पण काळाला ते देखवले नाही, कोरोना काळात समाजसेवा करता-करता कोरोनाने त्यांचाच 'बळी' घेतला. अन् परिवारासह समग्र तालुकाच उघड्यावर पडला. या अपार दुःखाचे डोंगर सावरत या सर्व घडामोडींचे साक्षीदार असलेले, सर्वकाही पाहिलेलं, अनुभवलेलं, सोसलेलं त्यांचे चिरंजीव जितेश भाऊ आहेत. आपल्या वडिलांच्या संस्कारात वाढलेले, त्यांचा राजकारणात येण्याचा उदात्त व व्यापक दृष्टिकोन जाणलेले आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले युवक नेते म्हणजेच आपले *विद्यमान आमदार मा. जितेश भाऊ अंतापूरकर होय.* 

               आदरणीय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी वडीलांसोबत काम करतांना गावागावात हक्काचे विश्वासू कार्यकर्ते जोडले, जिवाभावाचा नवतरूण वर्ग उभा केला. त्यांच्यावर खास जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणूनच ते आज समग्र परिसरातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. माणसं पारखण्याची अलौकिक शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे. आपला-परका, स्वार्थासाठी केवळ निवडणुकीपुर्ते संकुचित विचाराने येणारे आणि मनापासून तन-मन-धनाने आपल्यासाठी पारिवारिक सदस्याप्रमाणे काम करणारे यांना ओळखुन योग्य ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. हे करताना शक्यत्वे कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याचीही  काळजी घेतली. तरीही अनेकांचा मानसिक त्रास वगैरे यांचा सामना करावाच लागला. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. म्हणूनच आज त्यांना एक कौटुंबिक सदस्यासम सक्षम कार्यकर्तावर्ग मिळाला. यामुळेच विश्वासू स्नेह्यांचं सहकार्य आणि परिसरातील जनतेचं अपार प्रेम त्यांच्या पाठीशी आहे आणि भविष्यातही राहणार आहे. असे जनसमुदायांचे मने जिंकून सर्वांच्या हृदयात घर करणारे एकमेव अद्वितीय युवानेते म्हणून *मा. जितेश भाऊ अंतापुरकर,* यांचा गौरवाने उल्लेख केला जातो.

          परिसरातील जनतेने ज्या विश्वासाने आपल्यावर जी  "विधानसभा सदस्यत्वाची" जबाबदारी सोपवली त्या विश्वासाला पात्र होऊन, माय-बाप जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ न देण्याची शपथच त्यांनी घेतली आहे. तळागाळातील, खेड्यापाड्यातील अबाल-वृध्द-तरूण कार्यकर्त्यांची जाण ठेवून दूरदृष्टीने विकासकार्य करण्याचा मानस त्यांच्या ठिकाणी आहे. दिव्यांग बांधवांच्या समस्येचं निवेदन स्वीकारताना आमदार पदाचा लवाजमा बाजूला सारून गाडीतून खाली उतरून भररस्त्यात गुडघ्यावर बसून निवेदन अर्ज घेण्याचं औदार्य त्यांच्याजवळ आहे. याचाच अर्थ राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण व विकासकारण हा उद्देश घेऊन जनतेच्या प्रश्नांना प्रामाणिकपणे न्याय देणे हे ज्यांच्या रक्तात आणि संस्कारात दडलेलं आहे ते म्हणजे *मा. जितेश भाऊ अंतापूरकर* होत.

         आजपर्यंत देगलूरकरांना खास असं नेतृत्वच लाभले नाही, स्व.अंतापुरकर साहेबांच्या रूपात लाभलेलं काळाने हिरावले. पण जितेश भाऊंच्या नेतृत्वाने देगलूर वासियांच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. खरे तर या परिसराचेच भाग्योदयाला आले आहे असे मला वाटते. कारण परिसरातील दीन, दलित, गरीब, दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा करून लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेले वडील आणि आता मा.जितेश भाऊ आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाच्या कल्याणासाठी विधायक दृष्टिकोन घेऊन रचनात्मक कार्य हाती घेणारे, केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांसह विविध महामंडळाची अद्यावत माहिती असणारे, नवनव्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प केलेले सूज्ञ, अभ्यासू, दूरदृष्टी असलेले अभियंते म्हणजे *जितेश भाऊ अंतापूरकर* होत. परिसरातील खेडे-पाडे, वाड्या-वस्त्यासह प्रत्येक गावातील नागरिकांना विज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण इत्यादी मुलभूत सोयी-सुविधा, ग्रामिण व शहरी भागाला जोडणारे अंतर्गत रस्ते, सिंचनासाठी पाटबंधारे, धरणे, विहीरी व साठवण तलाव बांधून शेतीला मुबलक पाण्याचे स्रोत निर्माण करून देणे. तसेच मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतीला खानापूर MIDC च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देऊन, औद्योगिक शेती विकास प्रकल्प राबविणे, आणि अल्पभूधारक शेतकरी व भुमिहीन शेतमजूरांना सुक्ष्म-लघु-मध्यम स्वरूपाच्या उद्योग धंद्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार, स्वयंरोजगार व शेती पुरक व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे, परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावे म्हणून जुन्या औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण व नवीन सहकारी औद्योगिक वसाहती निर्माण करून उद्योगशिल होतकरू तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी संधी निर्माण करून देऊन स्वाभिमान व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी महत्वकांक्षी प्रकल्प व नाविन्यपुर्ण योजना राबविण्याचा उदात्त व व्यापक दृष्टीकोन असलेले *मा. जितेश भाऊ अंतापुरकर हे खऱ्या अर्थाने या परिसराचे 'विकासपुरुषच' ठरणार आहेत.* 

           काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा मा.श्रीमती सोनिया गांधी, मा.खा.राहुल गांधी, सरचिटणीस मा.प्रियंका गांधी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडकरांचे भाग्यविधाते मा.ना. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या समवेत अनेक दिग्गज ज्येष्ठांनी व परिसरातील सूज्ञ जनतेंनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची जाण ठेवत त्यांच्या असणाऱ्या अपेक्षाप्रती निष्ठापूर्वक काम करण्याचा निश्चयच मा. जितेश भाऊंनी केला आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर आपलं 'स्वत्व' सिद्ध करावंच लागतं. जो स्वत्व सिध्द करतो तोच नेतृत्व करु शकतो. आपण सर्व जनमतांनी *जितेश भाऊं अंतापुरकर* यांना विश्वासाने ती संधी दिली. त्या संधीचे सोने करत अनेक विकास कामांच्या योजना त्यांच्या हातून या परिसरात येवो व या भागाचा कायापालट होवो, त्यांच्या हातून अशीच समाजसेवा व राष्ट्रसेवा अविरत घडो आणि भविष्यात अजुनही उत्तुंग भरारी घेऊन महाराष्ट्रातील नव्हे तर 'देशातील एक युवानेतृत्व' म्हणून लौकिक प्राप्त होवो अशी आज वाढदिवसाच्या निमित्ताने मंगलमय शुभेच्छासह ईश्वर चरणी प्रार्थना....!

         आदरणीय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर,आपलं समग्र आयुष्य सुखी-समाधानी, आरोग्यमय, आनंदी व भरभराटीचे जावो, आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो याच अनंत कोटी मंगलमय शुभेच्छा...

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *