
अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी भुमाफियांनी कोणाला ओतले लक्षावधी रुपये
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारवाईचे ३-३ कारवाईचे आदेश असूनही वसई प्रशासन कारवाई जाणून-बुजून का करत नाही
वसई।प्रतिनिधी : वसई तालुक्यातील अनधिकृत बांधकामे हा अतिशय गंभीर आणि सातत्याने चर्चेत राहिलेला प्रश्न असुनही, प्रशासन मात्र या बाबतीत गंभीर नसुन, त्यांनी अनधिकृत बांधकांमाना स्वतःच्या कमाई चे साधन बनविले असुन, या बाबतीतल्या कायद्याला धाब्यावर बसविले आहे.
या संदर्भातील वास्तव असे की,वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे तथा वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना ४० भुमाफियांना ९ नोवेंबर २०२१ ला नोटिस काढुनहि आज दीड महिना नंतरही कारवाई करण्यास प्रशासन मात्र, प्रत्यक्ष कारवाई करण्यात कुचराई करणाऱ्या प्रशासनाला मँनेज करण्यात भुमाफियांची लाँबि यशस्वी ठरत आहे, हेच आज वसईच वास्तव आहे.
सदर अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी सेटिंग झाली, असल्याचे बोलले जात आहे ,तसेच मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार प्रशासन आणि संबंधित भुमाफियांत झाला असल्याने. या बांधकामावर कारवाई झालेली नाही.
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका वसई मंडळ अधिकारी सजा कामण हद्दीत पोमण येथील काही बांधकाम धारकांना बजावलेल्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोमण सर्वे नं. १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) शहाबुद्दीन शराकत अली मन्सुरी व इतर २) क्रांती निवृत्ती सावळकर, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८१/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान २) क्रांती निवृत्ती सावळकर व इतर, गाव मौजे पोमण सर्वे नंबर १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी जेठाराम मिश्रीलाल सोलंकी व इतर तसेच इमरान मुजाबअली पठाण, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) सुभेदार यादव व इतर २) अय्याज अहमद सरफराज खान, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी घेवरचंद देवरामजी देवड़ा, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान २) मो. आसिफ अब्बास मरेडिया, रुबीना आरिफ शेख यांच्या नावे, गाव मौजे पोमण सर्वे नं. १६२/३ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कुमारवेल्लू जेनमल रेड्डी, गाव मौजे मोरी सर्वे नं. ५६/१ व सर्वे नंबर ५७ पैकी, सर्वे नंबर ५८ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नरेंद्र सूर्यकांत शहा, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२, १८१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान २) मो. आसिफ अब्बास मरेडिया, ३) क्रांती निवृत्ती सावळकर, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नूरअफसा ईश्तियाक अहमद शेख, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुन्ना रामप्रसाद यादव व इतर, गाव मौजे पोमण सर्वे नं. १६४/१ पैकी व इतर येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी रॉयल इंड हब तर्फे पद्मश्री कल्याणजी गजरा, हरेश्वर रामजी भानुशाली, गाव मौजे पोमण सर्वे नं. १६२/१ पैकी येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी रॉयल इंड हब तर्फे पद्मश्री कल्याणजी गजरा, हरेश रामजी भानुशाली, जगदीश बाबुराव जाखड यांच्या नावे दि. २६/१०/२०२०, दि. १७/३/२०२१, दि. १५/९/२०२१, दि. ९/११/२०२१ रोजी अशाप्रकारे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दि. ९/११/२०२१ रोजीची नोटीस तर अंतिम नोटीस म्हणून बजावण्यात आली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील अनधिकृत बांधकामे हि वसई तालुक्यातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा असलातरी त्यावर कारवाई,करण्या बाबत प्रशासनमात्र असमर्थ आहे हेच यावरून स्पष्ट दिसते