मटका अड्डे बंद न झाल्यास सामाजिक संघटना पोलीस आयुक्तांची भेट घेणार महाराष्ट्रात जुगार,मटका बंदी कायदा मंजूर झाला आहे . संपूर्ण राज्यात या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत मात्र याला अपवाद ठरत आहे वसई गाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हत्ती मोहला व कोळीवाडा.याठिकाणी जवळपास पाच मटका व जुगार अड्डे सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत वसईतील सामाजिक संघटनांनी अनेक वेळा वसई गाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असताना देखील अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.यामुळे या मटका व जुगार अड्डा चालवणाऱ्या दादा,भाई लोकांबरोबर बीट अंमलदार यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याबाबतचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.सदरचे मटका व जुगार अड्डे तात्काळ बंद न झाल्यास पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेणार असल्याचे वसईतील एका सामाजिक संघटनेने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यात मटका,जुगार बंदी तथा गुटखा बंदी,डान्सबार बंदी कायदा आणला या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण राज्यात सुरू आहे. मात्र वसई गाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या कोळीवाडा व हत्ती मोहला क्षेत्रात मोठ्याप्रमाणात मटका जुगार सुरु आहे लोकांकडून साध्या कागदावर तीन नंबर लिहून घेऊन ती चिठ्ठी अडा चालणाऱ्या दादा,भाई यांच्याकडे द्यायची व त्यानुसार मटका लावायचा अशी पद्धत सध्या वसईतील कोळीवाडा क्षेत्रात सुरू आहे मटका खेळायला येणाऱ्या चरसी गर्दुल्ले कथा मद्यपी यांच्यामुळे परिसरातील मुली महिलावर्ग यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात वसई गाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्याकडे विविध सामाजिक संघटनांनी तक्रारी केल्या असून देखील पोलीस निरीक्षक कर्पे या मटका चालणाऱ्या दादा,भाई कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत मध्यंतरी जुगार व मटका संदर्भातील ऑडिओ क्लिप समाजमाध्यम व माध्यमांवर ती प्रसारित झाली होती मात्र तरीदेखील पोलीस निरीक्षक कर्पे यांनी या मटका चालणाऱ्या दादा,भाई वरती कारवाई केली नाही मटका जुगार यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेक जण देशोधडीला लागले आहेत मात्र याबाबत पोलीस निरीक्षक कर्पे यांना सोयरसुतक नाही ज्या क्षेत्रामध्ये व बीटमध्ये मटका जुगार डान्सबार सुरू असेल त्या बीट अंमलदार ला निलंबित करण्याचा देखील कायदा पास झाल्याचे समजते ज्या बीट अंमलदार त्या क्षेत्रामध्ये जुगार मटका डान्सबार सुरू आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व मटका जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी वसईतील एक सामाजिक संघटना पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले वसई कोळीवाडा व हत्ती मोहला येथे सुरू असलेले चार ते पाच मटका जुगार अड्डे तात्काळ बंद करावे यासाठी नागरिकांनी सह्यांची मोहीम राबविण्याचे सूत्रांकडून समजते गुन्हे प्रकटीकरण शाखा देखील या अवैध मार्गाने सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यांवर का कारवाई करत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.