
वार्ताहर – सामान्य नागरिकांना बोगस डॉक्टर कसा ओळखावा याचे पुरेसे ज्ञान नसल्याने बोगस डॉक्टरकडून होणाऱ्या लुटीला त्यांना बळी पडावे लागते. डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या पदवीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात. यात एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावरच पोलखोल होते.
बोगस डॉक्टर म्हणजे काय हे समजण्यासाठी सर्व प्रथम डॉ म्हणजे काय ते पाहू मित्रांनो १२ वि विज्ञान शाखेत किमान ५०% किंवा त्या पेक्षा जास्त गुण घेतल्या नंतर वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ( उदा MHCET,NEET ई.) दिल्यानंतर मेरीट नुसार विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळतो
त्यामध्ये प्रामुख्याने MBBS ( ऍलोपॅथी डॉ),BAMS ( आयुर्वेदिक डॉ) , BHMS ( होमिओपॅथीक डॉ),BUMS ( युनानी डॉ),BDS ( दातांचे डॉ ) , BPTH ( फिजिओ थेरपी डॉ ) या विद्याशाखा आहेत
ज्यामध्ये चार परिक्षा ५०% पेक्षा (प्रथम वर्ष – दीड वर्षाचे, द्वितीय,तृतीय व चतुर्थ वर्ष प्रत्येकि एक वर्षाचे ) जास्त गुण घेऊन पास व्हाव लागतं.
मुख्य म्हणजे तोंडी परीक्षा ५०% व लेखी परीक्षा ५०% वेग वेगळे गुण घेऊन पास व्हाव लागत.
दोन्ही पैकी एक जरी परीक्षेत नापास तर दोन्ही परिक्षा पुन्हा द्याव्या लागतात .
चार वर्ग पास झाल्यांनंतर शेवटी १ वर्ष इंटर्न शिप ( ट्रेनिंग ) मग संबंधित कौन्सिल त्या विद्यार्थ्यांना डॉ म्हणून मान्यता देत व विद्यपीठ स्नातक म्हणून मान्यता देत. म्हणजे डॉ होणे हि साडेपाच वर्षांची कठीण तपश्चर्या आहे
आता बोगस डॉ म्हणजे काय तर वरील सर्व विद्या शाखेच्या डॉ ना त्या त्या कौन्सिल चा वैद्यकीय व्यवसाय परवाना आणि क्रमांक मिळतो पण बोगस डॉ हा कुठेही शिकलेला नसल्याने त्याकडे अशी कुठल्याही प्रकारची कागद पत्र नसतात; असली तरीही खोटी असतात बहुतांश हि मंडळी नॉन मॅट्रिक असतात व कुण्या एखाद्या हॉस्पिटल मध्ये इंजेकशन, देणे सलाईन लावणे , इत्यादी कामे शिकतात व बाकीच्या गोष्टी आपल्यावर प्रयोग करत करत शिकत असतात .
आपण ज्या डॉ कडे उपचार घेतोय तो बोगस आहे का हे कसे ओळखायचं तर सोप्प आहे दवाखान्यात दर्शनी भागत कागद पत्र ( पदवी सर्टिफिकेट , रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ) लावलेली असतील तर त्यावर वर दिलेल्या पैकी पदवी आहे का ते पहावं. संशय आल्यास आपण डॉ ना त्याबाबत निश्चित विचारावं अशावेळी बोगस डॉ उत्तर देऊ शकत नाही तसेच प्रत्येक डॉ च्या लेटर पॅड वर पदवी व रजि नं असतो. क्लिनिक च्या फलकावर देखील या रजिस्ट्रेशन नंबर चा उल्लेख केला जातो हा नंबर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया च्या संकेतस्थावर जाऊन तपासून पाहू शकता. (MCI/NMC and MCIM are different website)
१) https://mcimindia.org.in/RemovedList.aspx
२) https://www.maharashtramedicalcouncil.in/
ज्या डॉ कडे लेटर पॅड नाही किंवा त्यावर पदवी व रजि नं नाही तो बोगस डॉक्टर.
सर्वात महत्वाचे बोगस प्राणी शासकीय पथक आल्यावर लपून बसतात.
नागरिकांची / रुग्णांची जबाबदारी
१) एखाद्या बोगस डॉ कडे यापूर्वी आपण उपचार घेतले असतील व बरे वाटलं असेल तरीही आपण यापुढे त्या कडून उपचार घेऊ नये कारण अर्धवट ज्ञानावर आधारित उपचार आपल्या ह्रदय , किडनी लिव्हर ,मेंदू ई साठी घातक असतात व वेळप्रसंगी आपल्या जीवावर बेतू शकत तेव्हा बोगस डॉ कडून उपचार अजिबात घेऊ नका.
२) ग्रामीण भागात वैध डॉ नसतील तर जवळपास च्या खेडयात जा जिथं वैध डॉ असतील अशा ठिकाणी जा किंवा शहरात जाऊन उपचार घ्या पण बोगस डॉ च्या स्वाधीन करून आपला अनमोल जीव धोक्यात घालू नये.
३) बोगस डॉ घरपोच सेवा देत असेल तरीही ती घेऊ नका; कारण घरपोच दिल म्हणून विष घेण्या सारखच आहे ते कारण अर्धवट ज्ञाना चा वापर करून दिलेलं औषध प्रसंगी विषा पेक्षा भयंकर असू शकत
४) इंजेकशन देणारा , तपासणी करणारा , सलाईन लावणारा प्रत्येक व्यक्ती डॉक्टर असतोच असे नाही हया खूप सोप्या गोष्टी आहेत आठ दिवसाच्या सरावाने (एकाद्या हॉस्पिटल मध्ये) तुम्ही पण शिकू शकता . पण त्या पेक्षा मह्त्वाचे शरीररचना शास्त्र ,औषधी शास्त्र ई शास्त्रांचा अभ्यास व रोगनिदान यांचा अभ्यास बोगस डॉ ना नसतो म्हणून दिल इंजेकशन म्हणजे हा डॉ हा गैरसमज डोक्यतून काढून टका
काही वेळेस बोगस डॉ चा गुण हा तज्ञ डॉ पेक्षा हि लवकर येतो कारण हि मंडळी भरपूर प्रमाणात स्टेरॉइड्स वापरतात , हायर अँटीबायोटीक वापरतात किंवा डबल डोस वापरतात लक्षात ठेवा या गोष्टी आरोग्यासाठी खूप घातक असतात तूर्त बरें वाटत असले तरीही याचे दूरगामी परिणाम आरोग्यावर होतात.तेव्हा बोगस डॉक्टर्स ला कायमचा रामराम करा.
५) या बोगस डॉक्टर्स शिवाय आपल्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन तंत्र मन्त्र , दोरी गंडा ,पाला पाचोळा , राख ई वापरून उपचार करणारे तांत्रिक , कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधी देणारे मेडिकल स्टोर्स , टीव्ही वर विविध औषधींची जाहिरात करणारे नट , नट्या हि सुद्धा बोगस डॉक्टर्सच आहेत आणि यांचे उपचार बोगस डॉक्टर्स एव्हढेच घातक आहेत.
अधून मधून अफवा पसरवल्या जात असतात कि BAMS ( आयुर्वेदिक ) व BHMS ( होमिओपॅथीक ) डॉक्टर्स ऍलोपॅथीक औषधी देऊ शकत नाहीत पण यात काहीही तथ्य नाही कारण सर्व वैद्यकीय शाखा ( MBBS,BAMS, BHMS, BUMS ) यांचा अभ्यास जवळपास सारखाच असतो फक्त pharmacology सोडून.
पण शासनाने आयुर्वेदिक अभ्यास क्रमा मध्ये यापूर्वी च ऍलोपॅथी pharmacology चा समावेश केला आहे तसेच होमिओपॅथीक डॉक्टर्स साठी दोन वर्षा पूर्वी विधानसभा व विधानपरिषद मध्ये विधेयक पास करून pharmacology चा कोर्स तयार केला आहे व होमिओपॅथीक डॉक्टर्स ना ऍलोपॅथी ची परवानगी दिली आहे. तेव्हा कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
बोगस डॉक्टर शोध समितीमध्ये कुणाचा समावेश असतो याबाबत अधिक माहिती:
तालुका समितीतील सदस्य तालुका समितीत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी असतात. नगरपालिका व महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती असते. जिल्हाधिकारी स्तरावरील समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक असे अधिकारी असतात. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक दर महिन्याला घेणे अपेक्षित असल्याची सूचना केली होती. या बैठकीचा आढावा बोगस डॉक्टर संबंधित कारवाईची माहिती प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आधी नजीकच्या पोलिस स्थानकात देणे आरोग्य विभागाला बंधनकारक आहे.