

कामण तलाठी कार्यालय बंद ; तलाठी गणेश पाटील यांचा फोन बंद
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका हद्दीतील कामण तलाठी कार्यालय बहुतांश वेळा बंद असते तर तलाठी गणेश पाटील यांचा भ्रमणध्वनी अधिक काळ बंदच असतो. त्यामुळे कामण तलाठी क्षेत्रातील नागरिक त्रस्त आहेत. लोकांची कामे होत नाहीत. वसई तहसीलदारांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका हद्दीतील कामण तलाठी कार्यालयाला कधीही टाळे लागलेले आपल्याला दिसेल. आणि या कार्यालयाचे तलाठी गणेश पाटील यांचा भ्रमणध्वनी अधिकांश वेळ बंदच असतो. तलाठी कार्यालय बंद असते. तलाठ्यांचा भ्रमणध्वनी बंद मग लोकांची कामे होणार तरी कशी? परिसरातील जनता त्रस्त आहे. याबाबत अनेकांनी वसई तहसीलदार उज्वला भगत यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. मात्र तक्रारींबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
कामण तलाठी कार्यालय वसई मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रात येते. वसईचे मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे तुरुंगात आहेत. त्यांना लाच घेताना रंगेहात अटक झालेली आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी ही उपलब्ध नाहीत. शासनाने त्वरित मंडळ अधिकारी पदी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कामण तलाठी कार्यालय बंद ठेवणे, तलाठ्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी बंद ठेवणे, लोकांची कामे न करून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी गणेश पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.