
प्रतिनिधी :
आज २०२१ वर्षाचा अखेरचा दिवस! ३१ डिसेंबर! आज रात्री बार आणि रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन करून धिंगाणा केला जाणार! पोलिसांना मैनेज करून बार आणि रेस्टॉरंट मालक नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या झोडणार!
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक कायदे केलेले आहेत. नेहमीप्रमाणे वर्षाचा अखेरचा दिवस उत्साहात साजरा होणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मनसोक्तपणे ३१ साजरा करता येणार नाही.
तरीही पोलीस व महानगरपालिका प्रशासनाला मैनेज करून रेस्टॉरंट व बार मालक मद्यपींकरिता “सोय” करून देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलीस व महानगरपालिका प्रशासनाला पैसे द्या आणि वाटेल ते करा. पोलीस आयुक्त सदानंद दाते व महानगरपालिका आयुक्त डी. गंगाथरन यांनी कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. बार व रेस्टॉरंट नियमाप्रमाणे चालू आहेत की नियमांचे उल्लंघन होत आहे यावर नजर ठेवण्याकरिता खास पथक नेमावे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.