वसई : आज १ जानेवारी म्हणजे शौर्य दिवस या दिवशी भीमा कोरेगांव येथे वीर योध्दा आणि ३०,००० पेशव्यांमध्ये घनघोर युद्ध झाले होते. त्या लढाईमध्ये ५०० शुर वीर ही लढाई जिंकले होते. म्हणुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी त्या शुरविरांना अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथील विजय स्थंभाला मानवंदना देण्यासाठी न चुकता पुणे येथे येत असत.
त्या निमित्ताने आज १ जानेवारीला प्रजा सुराज्य पक्षाने महिला विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा पदी मा. ज्योती पारेख यांची निवड केली आहे तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी मा. प्रशांत धोंडे यांची निवड करण्यात आली आहे. सदरील मान्यवरांना प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब तिगोटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. अब्दुल लतिफ शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पक्षाचे दायित्व सोपविण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी पक्षाचे संस्थापक अण्णासाहेबांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे, लोकांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचे सभासद वाढविण्याचे तसेच लोकांमध्ये आपल्या पक्षाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले.
सदर प्रसंगी मा.अनिल वाघेला (कोकण प्रांत अध्यक्ष, प्रजा सुराज्य जनरल कामगार संघटना) व सचिव गणेशजी, राष्ट्रीय बहुजन विकास संघटना कार्याध्यक्ष मा. जितेंद्र घोडेगवकर (शिरसाट), मोरे , ऋषिकेश राठोड संजू तडवी व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी वसई येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *