वसई फ्रोजन फूड शेजारी अनधिकृत बांधकाम सुरू, सरकारी अधिकारीच भूमाफियांचे गुरू?

   वसई महसूल विभागाच्या भ्रष्टचारी कारभारामुळे पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी वसई तालुका वाऱ्यावर सोडल्यामुळे आणि तहसीलदार यांच्या बेजबाबदार आणि आपल्या मनमानी कारभारमुळे तलाठी, , मंडळ अधिकारी यांनी आपली लाज - लज्जा - शरम सोडून आपण शासनाचे - जनतेचे सेवक आहोत हे विसरून आपल्या फायद्यासाठी भुमाफियांच्या चाकरीस लागले आहे. याच ताज उदाहरण म्हणजे पोमन ग्रामपंचायत हद्दीमध्ये पोमन पेट्रोल पंपाच्या जवळ वसई फ्रोजन फूड शेजारी माती भराव करून अनधिकृत बांधकामास सुरुवात झाली असून या ठिकाणी वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु त्या प्रकारे कोणतीही कारवाई झाली नाही. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या भ्रष्टाचारीचे पितळ उघडे पडले होते ज्यात महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना पंचेचाळीस हजाराची लाच घेताना लालूचपत विभागाने अटक केली. ज्यात महसूल विभागाचे अधिकारी यांचे काळे धंदे व भुमाफियांना छुपा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडींचा विचार करून पोमण येथील अनधिकृत बांधकामांवर योग्य अशी कडक कारवाई करून संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याची चर्चा वसई तालुक्यात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *