
प्रतिनिधी:
वसई पारनाका येथे बनावटी डॉक्टर हेमंत पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस डॉक्टरचा शोध घेत आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिकेने १५ दिवसापूर्वी बनावटी डॉक्टर सुनील वाडकर याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील बनावटी डॉक्टर्सचा मुद्दा ऐरणीवर आला. सुनील वाडकर यांच्यानंतर प्रभाग समिती आय हद्दीत पारनाका येथे व्यवसाय थाटून बसलेल्या हेमंत पाटील या बनावटी डॉक्टरवर महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालयाने गुन्हा दाखल केला.
हेमंत पाटील हा मागील अनेक वर्षांपासून प्रभाग समिती हद्दीत वसई पारनाका येथे आपले दुकान थाटून बसला होता. आता असा आरोप केला जात आहे की, प्रभाग समिती आय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत पाटील यांना पूर्ण कल्पना होती. मात्र त्याकडे वसंत पाटील यांनी कानाडोळा केला. हेमंत पाटील हा मागील अनेक वर्षांपासून लोकांच्या जीवाशी खेळत होता. वैद्यकीय व्यवसायाकरिता कोणतेही आवश्यक प्रमाणपत्र नसताना हेमंत पाटील हा बेधडकपणे डिस्पेन्सरी खोलून व्यवसाय करीत होता. रुग्णांना मूर्ख बनवीत होता. अखेर त्याच्या नकली व्यवसायाचे भांडे फुटले.
नकली डॉक्टर हेमंत पाटील याच्या गुन्हा दाखल झाला असून सदर आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेमंत पाटील याच्यावर कारवाई करण्याकरिता भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा अल्पसंख्यक विभाग उपाध्यक्ष तसनिफ शेख यांनी पोलीस आयुक्त मिरा भाईंदर वसई विरार यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती.