

वसई-विरार मनपा शेत्रात सध्या अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. सर्वच प्रभागा मध्ये दिवसाढवळ्या अनधिकृत बांधकाम उभे राहत असताना पालिकेचे अतिक्रमण विभाग मात्र झोपी गेल्याचे चित्र पालिका क्षेत्रात पहाव्यस मिळत आहे. असाच प्रकार प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार विभागांतर्गत येणाऱ्या कुंभार पाडा, या ठिकाणी ‘विजय तिवारी’, व विनोद तिवारी, अजय यादव,व संतोष यांच्या ३० ते ४५ चाळींच्या स्वरुपात अनधिकृत बांधकामावरून दिसून येत आहे. सदर बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असूनही या ठिकाणी अद्यापिही कारवाई नाही, तसेच याच ‘सी’ विभागात रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी, गाव मौजे पेल्हार सर्वे नं.२४३ या भूखंडावर विकासकाने अनधिकृत ४० ते ५०००० स्क्वेयर् फीट चे औद्योगिक गाळ्याचे बांधकाम निर्माण केले आहे. व फूल पाडा, सहकार नगर इथे अनधिकृत इमारतीचे जोमाने निर्माण होत आहे. या सर्व ठिकाणी केवळ संबंधित बांधकाम सहीसलामत ठेवण्याचे काम ईमानदारीने महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केले आहे. या मध्ये महत्वांची भूमिका निभावलेल्या संबंधीत प्रभारी सहा आयुक्त यांची कार्यपध्दत निष्क्रिय स्वरुपाची असून त्यांच्या निष्क्रियतेमुळे, वसई-विरार शहर महानगरपालिकेचा कराेडो रुपयांचा महसुलही बुडाला आहे. प्रभारी सहा.आयुक्त व त्यांचे अतिक्रमन अधिकारी सदर अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आर्थिक हितसंबंध जोपासले असलेल्याची शंका नाकारता येत नाही. तसेच प्रभाग समिती ‘एफ’ गाव मौजे पेल्हार या ठिकाणी ही अनधिकृत इमारतींच्या बांधकामांचा व जाबर पाडा, रिचर्ड कंपाउंड सुर्वे नं १०९ या भूखंडावर अनधिकृत औद्योगिक गाळयांचे बांधकामांचा सुळसुळाट दिसून येत आहे. याच प्रमाणे प्रभाग ‘जी’ वालिव या प्रभागात गाव मौजे कामन सुर्वे नं. ५४/१ व सर्वे नं. ७६ सागपाडा या कामनच्या इतर भागात तर अनधिकृत बांधकामांचा जणू पाऊसच पडत आहे सूत्रा मार्फत खबर आहे की ही सगळी अनाधिकृत बांधकामे कामन परिसरात प्रदीप गुप्ता नामक विकासक यांची दिसून येत आहे व मौजे वालीव सर्वे नं ६१/१, या भूखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्र. सहा आयुक्त सुभाष जाधव व अभियंता कौस्तुभ तामोरे यानां दिसेनासे झाले आहे, आणि दिसले तरी कारवाई करू शकत नाही कारण विकासकाने स्टे घेतला आहे, सुट्रांचे म्हणने आहे जेव्हा महानगरपालिकाचे सबऺधित अधिकारी अनधिकृत बांधकामांवर नोटिसा बजावते त्याच वेळी केवैत दाखल का नाही करत जर् त्याच वेळी हे केले असते तर त्या अनधिकृत बांधकामांना स्टे मिळालाच नसता. पण हे जर योग्य ते वेळी झाले अस्ते तर खिसे कशे भरले अस्ते ? भुमाफीयांचे खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरूच, हे सगळे अनधिकृत बांधकामे कुणाच्या संरक्षणात होत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना सत्वत आहे. अधिकऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच अस्तानाही आयुक्त डी गंगाथरन, अतिरिक्त आयुक्त आशीष पाटिल यांचा कानाडोळा हे म्हणयापेक्षा त्यांची लाभलेली साथ हे म्हणने काही अयोग्य नाही, अनधिकृत बांधकाम हे काय असते हे प्रभाग ‘ ई ‘ या विभागातच दिसून येते, या विभागात असेलेल्या सहा. आयुक्ता रुपाली शंखे यांनी भुमाफियांचे अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी ठेकाच घेतला आहे असे दिसून येते, प्रभाग ‘ई’ हद्दीत गाव मौजे निळेमोरे, सर्वे क्र ५७. वृंदावन गार्डनच्या मागे, व वगेश्वरी हिल-स्टार बजारच्या मागे, व सरकारी रेशन दुकानाच्या मागे, आणि गाव मौजे निळेमोरे, इथे विकासक अनधिकृत इमारतींचे बांधकाम करीत आहे, या अनधिकृत इमारतीचे सेकडाे तक्रारी करूनही, पेपर मध्ये बातमी लावूनही काहीही फरक दिसून येत नाही, अनधिकृत बांधकामे कमी होण्या पेक्षा वाढतच चालले आहे. सदरच्या बांधकामावर महानगरपालिका तोडक कारवाई कधी होणार? हा प्रश्न चिन्ह सामान्य नागरिकांन समोर उभा राहिला आहे.