वसई विरारमध्ये तोतया डॉक्टर सुनील वाडकर यांचे प्रकरण चांगलेच तापले आहे १४ वर्षे हा बोगस डॉक्टर वसई विरार महापालिका, जिल्हाआरोग्य विभाग आणि नागरिकांची फसवणूक करत होता . चक्क महापालिकेत हा तोतया डॉ मुख्य आरोग्य अधिकारी म्हणुन काम करीत होता ह्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता वसई विरार येथील जनता विचारत आहे. सत्ताधारी नेत्याच्या आशीर्वाद शिवाय वसईत काहींही घडण शक्य नाही. हे सर्वांना माहीत आहे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नव्हती बोगस सी सी बोगस ठेकेदार. बोगस बांधकाम बोगस नोकरभरती घोटाळा टॅक्स चोरी घोटाळा अश्या अनेक पराक्रम नी वसई विरार महापालिका कुप्रसिद्ध असताना आता बोगस डॉक्टर चे प्रताप उघड झाले आहेत. आंधळी मुकी आणि बहिरी असलेली महापालिका प्रशासन च्या निष्क्रियते मुळे आज महापालिकेला मलनिस्सारण प्रकल्प सात ठिकाणीं सुरु करणे अपेक्षित होते . तसे न केल्याने प्रति दिन दहा लाख रु दंड हरित लवाद ने बजावला आहे त्या मुळे शंभर कोटी रु दंड आता पर्यन्त झाला आहे नेते नगरसेवक ह्यांचे अपयश कुकर्म आता टॅक्स भरणाऱ्या जनतेच्या माथी मारले जात आहे. शहरात सात पैकी फक्त एक मलनिस्सारण प्रकल्प बोळिज येथिल 158 कोटी रू खर्च करून देखील तो सुरु न केल्याने तो मागील दोन वर्ष बंद ठेवल्याने हरित लवाद ने हा दंड बजावला आहे त्याची वसूली करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगीतल आहे. असे उच्च दर्जाचे प्रताप गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली वसई विरार महापालिका राज्यात कुप्रसिद्ध आहे. परंतू नागरिकांच्या जीवाशी खेळ करत ह्या पिवळ्या आघाडीने चक्क बोगस डॉक्टर मुख्य आरोग्य अधिकारी म्हणुन नियुक्त केले त्या मुळे शहरातील अनधिकृत वस्ती असलेली चाळी असलेल्या वस्तीत नालासोपारा संतोष भुवन, पेल्हार, विरार चंदनसार, वालीव, भोईदापाडा, मोरेगाव, हनुमान नगर, बिलाल पाडा, पांडय़े नगर, धानीव बाग, वाकणपाडा इथे मोठ्या प्रमाणत बोगस डॉक्टर नी आपला पसारा वाढवला आहे .महापालिकेने बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यासाठी फक्त कागदावर नेमण्यात आलेल्या दिखावू सर्व समिती कमिटी पणं वेळीच कारवाई करण्यासाठी बोगस रित्या कुचकामी ठरल्या आहेत स्थानिक नेते नगरसेवक ह्यांचा आशीर्वादाने बोगस डॉक्टर सुसाटआपला वैद्यकीय व्यवसाय बिनभोभाट करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे . वसई विरार महापालिकेत वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी राजकीय नेते कार्यकर्ते नगरसेवक ठेकेदाराच्या दबाव मुळे मोकळे पणाने काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत वसईतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे त्यांची फसवणुक करून पैसे उकळणाऱ्या बोगस डॉक्टर वर वसई डी एम पेटीत हॉस्पिटल चे आरोग्य अधिकारी डॉ वसंत पाटिल ह्यांनी योग्य कारवाई केल्याबद्दल आज भारतीय जनता पक्षाच्या वसई शहर मंडळ च्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले सरचिटणीस नंदकुमार महाजन सचिव मुकुंद मुळे किरण पाटील उपाध्यक्ष महिला मोर्चा सुचिता शेट्टी युवा मोर्चा सरचिटणीस मनमित राउत. प्रथमेश ब्रम्हणिया. अमित पवार असे अनेक पदाधिकारी या वेळीं उपस्थीत होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *