
नायगाव (प्रतिनिधी)- नायगाव पूर्वला काल सावित्रीबाई फुले यांची जयंती खूप उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते . नायगाव पूर्वीच्या सोमेश्वर नगर येथे काल बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत ही जयंती खूप शांतते कोरोना नियमांचे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष अनिल साळवी आणि पवार सर यांनी उत्तम रित्या कार्यक्रम नियोजनाची बाजू सांभाळली . समाजसेविका कर्मवीर स्नेहा जावळे या युवाशक्ती फाऊंडेशन व स्नेह बचत गटाच्या कार्यकर्त्यांसह या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमात स्नेहा ताई सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातल्या काही घटना व त्यांनी केलेल्या मौल्यवान कार्याबद्दल माहिती दिली, याच बरोबर त्यांनी स्वतःच्या मनोगतामध्ये शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई मुळे मी ही कशी स्वतःच्या पायावर पुन्हा उभं राहू शकले आणि शिक्षणामुळे स्वतःचे करिअर पुन्हा मी उभं करू शकले याच्या विषयी त्यांनी थोडक्यात महिलांना माहिती दिली , व महिलांना शिक्षण घेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले प्रेरणा दिली. एक महिला शिकली तर ती पूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते या मतावर ठाम असणाऱ्या स्नेहा ताईंनी महिलांना पुढे येण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणावर महिलांना मार्गदर्शन केले.