
प्रतिनिधी:
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वसई पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तानी मॉलमधील पंखा फास्ट या रेस्टॉरंट व बारमध्ये धिंगाणा चालू असल्याची खबर पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्यापर्यंत गेल्यानंतर अखेर नाईलाजाने वसई पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. मात्र सदरची कारवाई थातूर मातुर असून ठोस कारवाई व्हायला हवी.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वसई पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तानी मॉलमधील पंखा फास्ट या रेस्टॉरंट व बारमध्ये ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री उशिरा धिंगाणा चालू होता. कोविड -१९ नियमांचे खुल्लमखुला उल्लंघन केले गेले. सदर बाबत पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्यापर्यंत तक्रार गेल्यानंतर आयुक्तांच्या आदेशावरून वसई पोलिसांना कारवाई करणे भाग पडले. पंखा फास्ट रेस्टॉरंट आणि बारमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून रात्री उशिरापर्यंत नाचगाणी चालू असतात. तसेच १८ वर्षाखालील मुली नाचताना दिसतात. अत्यंत बेकायदेशीर कामे चालत असून वसई पोलिसांना मैनेज करून बेकायदेशीर कामे होत आहेत. ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री नियमांचे उल्लंघन करून जवळपास २५०-३०० लोक या रेस्टॉरंट व बारमध्ये जमा असताना कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी उचित कारवाई केलेली नाही. भादंविसक २६९, २७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामा पांडे व राहुल हे दोघे या रेस्टॉरंट बारचे भागीदार आहेत. राहुल याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मग रामा पांडे याला का सोडले? वास्तविक उपस्थित सर्वांवर कारवाई होणे आवश्यक असताना पोलिसांनी सर्व उपस्थितांना सोडून दिले. त्यावेळी तेथे किती लोक उपस्थित होते हे जाणून घेण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज तपासावे व उपस्थित सर्वांवर कारवाई करावी. पंखा फास्टमधील गैर धंद्यांना संरक्षण देण्याच्या बदल्यात वसई पोलीस निरीक्षक यांना अंदाजे ३० हजारांचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे.