

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत होळी येथे ठाकूर अँड सन्सच्या लगतं अनिल सिंगचे अगदी जोरात बांधकाम चालू असून सदर बांधकामाला महाभ्रष्ट महानगरपालिका अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभले आहे. त्यामुळे सदर बांधकामावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत होळी येथे अनिल सिंगचे व्यावसायिक गाळ्या भव्य अनधिकृत बांधकाम चालू असून सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करून बांधकाम धारकावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत. सदर बांधकामाला कागदपत्रे सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे. मात्र बांधकाम धुमधडाक्यात चालू आहे. सदर बांधकामाची तक्रार केल्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर व अतिक्रमण विभाग प्रमुख नितीन वनमाळी यांनी सदर ठिकाणी जाऊन बांधकाम साहित्य जप्त केले. मात्र त्यानंतर ही काम चालूच आहे. अतिक्रमण विभाग प्रमुख नितीन वनमाळी यांनी सामान जप्त केले सदर प्रकरणात अधिकाऱ्यांनी सौदेबाजी केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील ज्यांच्या खांद्यावर अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी आहे तेच अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत आहेत. २०० रुपये प्रती चौरस फूट प्रमाणे वसुली केली जात आहे. लाचेचा हा पैसा मंत्रालयापर्यंत संबंधित प्रत्येक टेबलवर प्रत्येक अधिकाऱ्याला मिळत असल्यामुळे बिनधास्तपणे भूमाफिया अनधिकृत बांधकामे करीत आहेत.