पालघर दि 7 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा कार्यक्रम जिल्हा कार्यालय पालघर कडून सावरखांड, ता. वाडा येथे आयोजित करण्यात आला होता . सदर कार्यक्रम माविम अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमास , पंचायत समिती सभापती रघुनाथ माळी, पंचायत समिती उपसभापती . अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्या भक्ती वलटे,जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड पालघर किशोर पडघम पंचायत समिती सदस्य जगदीश पाटील, पंचायत समिती माजी सभापती सौ. नडगे ,मंडळ कृषी अधिकारी वाडा श्री. जगताप , आदी उपस्थित होते.

श्री.दुपारे यांनी उपस्थितांना Teach my Lesson या शैक्षणिक अँप बद्दल माहिती दिली. श्रीमती ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमात महिला बचत गटातील महिलांना बचत गटाचे ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जि. प. शाळा सावरखांडच्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांचे हळदी कुंकू करून महिलांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. तसेच जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा कार्यक्रमांतर्गत दहावी व बारावी मध्ये ८०% व त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गरीब मुलींचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे व माविम अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांचे सुद्धा त्यांच्या अतुलनीय कामगिरी बद्दल शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ह्या कार्यक्रमात बोलताना ज्योती ठाकरेनी असे सांगितले कि मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी काम करत आहे, करणार आहे. महिलाच्या प्रश्नाला महत्त्व देवून त्यांची अडचण सोडवणेसाठी माविम काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *