
वार्ताहर – अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय विकत घेणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेत मनवेलपाडा सामाजिक संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक ०८/०१/२०२२ रोजी. सखुबाई सभागृह, मनवेल पाडा, विरार पूर्व येथे मोफत कृत्रिम अवयव व साधनांच वाटप करण्यात आले. कृत्रिम हात, पाय, कॅलीपर्स, कुबड्या पूर्व तपासणी शिबिर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आले होते. दिव्यांग बांधवांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान आहे असे सौ संगीता भेरे यांनी मत व्यक्त केले. अपंग बांधवांचे जीवन सुखकर व्हावे तसेच आपले आयुष्य त्यांनी सक्षमपणे जगावे यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अपंग हक्क विकास मंच कार्यरत आहे.प्रमुख मान्यवर म्हणून नालासोपारा विधानसभा आमदार श्री क्षितिज ठाकूर, मा. नगरसेविका सौ संगीता भेरे, मिनल पाटील, श्री. अनिल पाझारे, शमीम खान, मनोज राऊत, अतुल पाटील, रुग्णमित्र राजेंद्र ढगे, विनोद पाटील, जहिर शेख, जहिर लाला, श्री प्रभाकर झगडे, सौ भारती पवार, श्रध्दा मोरे, निशा सावे, विजय चोघळा, कुमुद शहाकार, श्रीलक्ष्मी अडापल्ली, दीपक मांडवकर, साम टीव्ही पत्रकार चेतन इंगळे उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री किशोर भेरे, कार्याध्यक्ष गणेश सुर्वे, सचिव हेमंत परेड, खजिनदार संदीप शिंदे, त्याच बरोबर पदाधिकारी व सभासद यांच मोलाच सहकार्य लाभले