
मुंबई(प्रतिनिधी)-दिनांक:- 09 /01/2022 रोजी मैत्री संस्था , महाराष्ट्र राज्य याची मिटिंग घेण्यात आली, सदरची मिटिंग ही गांधी बुक सेंटर, भाजी गल्ली शेजारी, नाना चोक, ग्रँड रोड, मुंबई येथे 3.30 वाजता आयोजित केली होती.मिटिंग मध्येप्रथम स्वर्गीय : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ , यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व मैत्री संस्थेचे अध्यक्ष मा. सुरज भोईर, व महासचिव मा. मेगना जोशी मॅडम यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले व पदाधिकारी यांचा कार्यअहवाल मागून घेतला. सदरच्या कार्यक्रमात वसई पापडी येथील नामांकित महिला एड. किरण म्हात्रे हिला ” पालघर जिल्हा अध्यक्ष” या पदावर नियुक्ती करण्यात आली आणि पालघर जिल्हा ची जबाबदारी सोपविण्यात आली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एड. किरण म्हात्रे हिला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच वसई चे सुपुत्र व नामांकित समाज सेवक मा. फिरोज खान यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी, मा. श्री. आसिफ नासिर शेख, यांची युआ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. मा. राजेश जाधव, यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव, मा. कपिल सिर सागर, यांची मुंबई प्रदेश अध्यक्ष व महाराष्ट्र संघटक , मा. विनिता तोंडवळकर यांची महाराष्ट्र संघटक व मुंबई शहर अध्यक्ष, मा. प्रदीप जानकर, यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक व मुंबई शहर प्रभारी , मा. विजय मोरे, यांची ठाणे जिल्हा कार्यधक्ष, मा. विजय गोडबोले, यांची पालघर जिल्हा कार्यधक्ष, मा. मकरंद वागनेकर, यांची सल्लागार, मा. गंगाधर म्हात्रे यांनी सल्लागार, मा. संतोष भोईर, यांची सल्लागार, मा. अमेय भोसले, यांची महाराष्ट्र सचिव, मा. मेघना जोशी, सरचिटणीस व नवी मुंबई प्रभारी, मा. विनायक जावलेकर, यांची उपाध्यक्ष या सर्व पदाधिकारीची निवड करण्यात आली आहे, पुढील कार्यक्रमात तसे लेखी नियुक्ति पत्र देण्यात येतील.