

प्रतिनिधी:
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका हद्दीतील सजा कामणचे तलाठी गणेश पाटील यांचे कार्यालय बंद, त्यांचा भ्रमणध्वनी बंद, गणेश पाटील हे आजारी असल्यामुळे कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे नागरिक त्रस्त असून त्याबाबतच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाल्या. अनेकांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसून गणेश पाटील यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होते.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाने त्यांना ठरवून दिलेले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडायला हवे. कर्तव्यात कसूर केल्यास त्या अधिकारी वा कर्मचारी याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका हद्दीतील सजा कामणचे तलाठी गणेश पाटील यांचे कार्यालय अधिक काळ बंदच असते. त्यांचा भ्रमणध्वनी बंद असतो. ते आजारी असतात. गणेश पाटील यांचा मुलगा कल्पेश पाटील हा कामण तलाठी कार्यालयाचे कामकाज सांभाळत असून त्याने एक खाजगी इसम मदतनीस ठेवला आहे. शासकीय कार्यालयात खाजगी इसम ठेवणे गैर असून सदर प्रकरणी शासनाच्या आदेशावर कारवाई होत नाही.
सदर बाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या. लिखीत तक्रारी दिल्या गेल्या मात्र कोणतीही कारवाई नाही. प्रशासन गणेश पाटील यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर बाबत उचित कारवाई व्हावी.