
वार्ताहर – वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचं प्रकरण जसे जसे उघडकीस येत आहे तसे त्या मागील गुन्हेगारी वृत्ती व त्यातून होणारे समाजाचे अतोनात नुकसान समोर येत आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी व सुशिक्षित नागरिकांची याबाबत असलेली अनास्था यामुळे अशा बोगस डॉक्टरांची गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते.
अलीकडेच वसई तसेच मिरा रोड येथे मसाले विक्री करणार बोगस हाडांचा डॉक्टर हेमंत पाटील याच प्रकरण समोर आली असता या बोगस व्यक्ती वर अमरावती येथील राजपेठ पोलिस स्टेशन मध्ये बोगस डॉक्टर चा गुन्हा असल्याचे आढळून आले (२०१४) तद्नंतर हाच व्यक्ती वसई विरार क्षेत्रात २०१८ पासून वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले. आपल्या यंत्रणेतील दोष मुळे अशी व्यक्ती आपली दुकाने थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळ करत होती. रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी बोगस डॉक्टर संबंधित माहिती एका क्लिक द्वारे स्थानिक पातळीवरील आरोग्य विभागात उपलब्ध झाली पाहिजे अशी यंत्रणा अस्तित्वात यावी या संदर्भात सरकार पातळीवर सूचना केल्या आहेत. म्हणजेच एखाद्या बोगस डॉक्टर वर एखाद्या जिल्ह्यात गुन्हा नोंद झाला असेल तर त्याची माहिती इतर जिल्ह्यात देखील मिळायला हवी जेणेकरून ती बोगस व्यक्ती इतर जिल्ह्यात त्यांचं बोगस डॉक्टर दवाखाना/रुग्णालय सुरू करण्यास त्यांना मज्जाव होईल. ही माहिती बोगस डॉक्टर शोध समिती कडे संकलित केलेली असावी.
अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णमित्र कार्यरत असतात. बोगस डॉक्टर शोध समितीने प्रत्येक प्रभागात बोगस डॉक्टरांची यादी फलक लावून प्रसिद्धी करत बोगस डॉक्टर कसा ओळखावा या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे मत श्री विनोद साडविलकर (रुग्णमित्र – महाराष्ट्र) यांनी व्यक्त केले.